महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात दि.१० मे रोजी गरवारे बालभवन, सारसबागेसमोर जाहीर सभा असल्यामुळे वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.
जेधेचौक, सारसबाग, सावरकर चौक, मित्रमंडळ चौक, पुरमचौक, टिळक रोड व बाजीराव रोडवर वाहतूक कोंडी होवू नये, तसेच वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी म्हणून पोलीस उप-आयुक्त वाहतुक शाखा रोहिदास पवार यांनी वाहतुकीचे बदल जाहीर केले आहेत.
त्यानुसार, सिंहगड रोड वरुन सावरकर चौक येथुन बाजीराव रोडला खालीलप्रमाणे बदल असेल. पर्यायी मार्ग सावरकर चौक मित्रमंडळ चौक होल्गा चौक मार्गे इच्छित स्थली जातील. मित्रमंडळ चौकाकडुन येवुन सावरकर चौक येथुन बाजीराव रोडला खालीलप्रमाणे बदल असेल.
पर्यायी मार्ग मित्रमंडळ चौक- सावरकर चौक डावीकडे वळण घेवुन सिंहगडरोडने दांडेकर पुल मार्गे इच्छित स्थळी जातील. जेधे चौकामधुन येवुन बजाज पुतळा चौकामधुन बाजीराव रोडला खालीलप्रमाणे बदल असेल.
पर्यायी मार्ग: जेथे चौक गजाज पुतळा चौक डावीकडे वळण घेवुन सावरकर चौक उजवीकडे वळण घेवुन सिंहगडरोडने इच्छित स्थळी जातील. सातारा रोडवरुन येवुन जेधे उड्डाणपुलावरुन बाजीराव रोडला जाणा-या वाहनांनी होल्गा चौक, मित्रमंडळ चौक, सावरकर चौक सिंहगड रोडने जावे.
सोलापुर रोडने जेधे चौक अंडरपास मार्गे येणा-या वाहनांनी जेधे चौक होल्गा चौक मित्र मंडळ चौक, सावरकर चौक सिंहगड रोडने जावे, असे बदल वाहतुक शाखेने केलेले आहेत. याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे.
