आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

प्रसिद्ध अभिनेत्री विद्या सावळे यांच्या उपस्थितीत रंगला स्नेह मेळावा

Spread the love

बार्शीच्या बीपीएड कॉलेज वर्गमित्र भेटले 25 वर्षानी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ

बार्शी – शिक्षण शास्त्र महाविद्यालय बार्शी या महाविद्यालयाच्या बीपीएडच्या 99- 2000 या बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला. आपापल्या आयुष्यात सेटल झालेले 25 वर्षांपूर्वीचे मित्र-मैत्रिणी शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्रांगणात पुन्हा एकदा एकत्र जमले. प्रसिद्ध अभिनेत्री विद्या सावळे यांच्या उपस्थितीने सोहळ्याला आणखीनच रंगत आली.

स्नेह मेळाव्यासाठी गोवा सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी पुणे व सोलापूर जिल्ह्यातून जवळजवळ 40 वर्ग मित्र-मैत्रिणी जमले होते. या निमित्ताने सर्वांनीच जुन्या आठवणींना उजाळा देत हसत खेळत एकमेकांची विचारपूस केली.

पंचवीस वर्षांपूर्वीच कॉलेज आणि आत्ताच कॉलेज यामध्ये अमुलाग्र बदल झाला असून सध्या कॉलेजमध्ये सर्वच सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. महाविद्यालयातील झालेला चांगला बदल पाहून सर्वच विद्यार्थी आनंदित झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य गोरे, प्राध्यापक सुरेश लांडगे, माजी नगरसेवक युवा नेते तथा माजी विद्यार्थी विजय नाना राऊत, विद्यार्थी प्रतिनिधी समीर वायकुळे, अनेक मालिकेतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी गुणी अभिनेत्री व बॅचमेंट विद्या साळवे यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी सर्वांनी आपल्या मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा देत येणाऱ्या भविष्यात इथून पुढे कायम एकमेकांच्या संपर्कात राहून दरवर्षी एकत्र येण्याचा संकल्प करुन एकमेकांना योग्य ती मदत व योग्य ते सहकार्य करण्याचा शब्द दिला.

यावेळी स्वागत गीत निर्मला हेशागोल, अर्चना देसाई वनिता सुरवसे गुडे यांनी सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील कांबळे यांनी केले. प्रास्ताविक समीर वायकुळे यांनी तर आभार किरण कोकाटे यांनी मानले.