आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जयंती व चांदपीर यांच्या यात्रेनिमित्त 61 जणांचे रक्तदान

Spread the love

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

बार्शी ( यावली ) : बार्शी तालुक्यातील यावली या गावी अहिल्यादेवी होळकर, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच चांदपीर साहेब यांच्या यात्रेदिवशी ६१ जणांनी रक्तदान केले.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संभाजी ब्रिगेड बार्शी तालुकाध्यक्ष आनंद काशीद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापारेषांचे अभियंते रणजीत पोकळे, कुमार बप्पा शिरसागर प्रल्हाद तुरे, नागनाथ काकडे, जयहिंद खरात गुरुजी, परमेश्वर देवकते, रामदास सालगुडे नेमिनाथ इंदलकर, मोहन मिरजे, अभिजित उकरंडे, कुमार क्षिरसागर, रणजित पोकळे, अतुल काकडे, शहाजी धरमे, रामदास हुजरे, महादेव चव्हाण उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश लोखंडे, काशिनाथ शिंदे, शहाजी कदम, दिपक कदम, बापु सरवदे, नामदेव उकरंडे यांनी परिश्रम घेतले. प्रचंड उन्हाचा तडाका अंगाची लाही लाही करणारे ऊन तरीदेखील यावली ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतल्यामुळे या ग्रामीण भागात होत असलेल्या रक्तदान शिबिराचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम यावली संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष ईश्वर पोकळे यांनी घेतले.