आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

हाडोंग्रीच्या भगवंत विद्यालयाचा दहावीचा निकाल 88 टक्के

Spread the love

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

भुम : तालुक्यातील मौजे हाडोंग्री येथील भगवंत विद्यालयाचे एसएससी परीक्षा मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षचा निकाल 88 टक्के लागला.

गुणवंत विद्यर्थांचा विद्यालयामध्ये सत्कार करण्यात आला. कचरे प्रिया बळीराम 86%, रामगुडे शिवरत्न रंजीत 84.60%, जगदाळे प्रथमेश रणजीत 82.20, रामगुडे करण अनिल 81.20% लोमटे अमित सतीश 80.20%या विद्यार्थ्यांचा सत्कार त्रिमूर्ती प्रसारक मंडळा संचलीत भगवंत विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

मुख्याध्यापक नवनाथ डंबरे याचा सेवानिवृत्ती निमित सत्कार करून नवीन मुख्याध्यापक म्हणून श्रीमंत शिंदे यांच्याकडे पदभार देण्यात आला.याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य मुक्ताप्पा तळेकर, अनिल तळेकर, शांतलिंग घोंगडे, सुनील डोके, रमेश सुतार, श्रीमती कवडे, सतिश लोमटे, रोहिदास टेकाळे, सुधीर क्षीरसागर, रामा सुरवसे, कमालाकर पोतदार यांच्या सह विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रकाश पवार यांनी केले.