आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

वाचनालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ

बार्शी : बार्शी येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय येथे गुरुवारी सकाळी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.

वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे मानद काडा, सचिव आनंद पुनमिया यांनी प्रास्ताविक केले.

संचालक धिरज कुंकूलोळ, रूपेश कांकरिया, आनंद सुराणा, अशोक कांकरिया, प्रमोद भंडारी हे उपस्थित होते. तसेच वाचनालयाचे वाचक व सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संचालक धिरज कुंकूलोळ यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव, सहायक ग्रंथपाल पल्लवी तौर, विराज पतंगे यांनी परिश्रम घेतले. यावेळी मान्यवरांनी शिवराज्याभिषेक दिनाची माहिती दिली.