सोलापूर पोलिसांची कामगिरी, 15 मोटारसायकली हस्तगत
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
सोलापूर : सोलापूर, पुणे, नगर, धाराशिव व कोल्हापूर या पाचजिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरात मोटारसायकली चोरी करत असलेल्या अट्टल चोरट्यास जेरबंद करण्यात सोलापूर पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी त्याच्याकडून १५ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. सोलापूर जिल्हातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे वाढत असल्याने पोलीस अधीक्षक, व अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपीचे शोध घेवुन गुन्हे उघड करणेबाबत पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांना आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस पथके सतर्क होती. सुरेश निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उप निरीक्षक सुबोध जमदाडे, व रविराज कांबळे, अंमलदार यांना गुन्हे उघड करणेबाबत व रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचा शोध घेण्याचा आदेश दिला होता.
सुबोध जमदाडे व रविराज कांबळे व त्यांचे सहकारी हे पंढरपूर उपविभागात पेट्रोंलिग करीत असताना पोलीस हवालदार रवि माने यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, कुर्डुवाडी येथून चोरीस गेलीली मोटार सायकलवर एक इसम तिन रस्ता चौक, पंढरपूर येथे चोरलेली मोटार सायकल विक्रीसाठी येणार आहे.
माहिती मिळताच पोउपनि सुबोध जमदाडे, व पथकातील पोउपनि रविराज कांबळे व त्यांच्या पथकाने सापळा रचुन त्या ठिकाणी एकास ताब्यात घेतले. अधीक विश्वासात घेवुन याच्या ताब्यातील मोटार सायकल बाबत विचारपुस करता सदर मोटार सायकल त्याने कुर्डुवाडी येथुन चोरी केल्याची कबुली दिली.
तसेच आरोपीस अधीक विश्वासात घेवुन सखोल तपास करता त्याने सोलापूर, अहमदनगर, पुणे, धाराशीव व कोल्हापूर येथुन चोरलेले एकुण 14 मोटार सायकली त्याचे घराच्या पाठीमागील पडक्या जागेवर लपवुन ठेवल्याचे सांगितले.
प्लीसनी तातडीने त्या ठिकाणी जात मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत. पुढील तपास कुर्डुवाडी पोलीस करीत आहेत. या मधील तीन मोटार सायकली पुणे शहरातील आहेत. अधिक माहिती साठी कुर्डूवाडी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अट्टल चोरट्यास पकडण्याची कामगिरी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली, व सहा.पोलीस निरीक्षक, नागनाथ खुणे यांचे मदतीने पोलीस उप-निरीक्षक सुबोध जमदाडे, व पथकातील पोलीस उप-निरीक्षक रविराज कांबळे, श्रीकांत गायकवाड, मंहमद इसाक मुजावर, सलीम बागवान, विजयकुमार भरले, रवि माने, धनराज गायकवाड, अनवर अत्तार, सुरज रामगुडे, विनायक घोरपडे सतीश बुरकुल यांनी बजावली आहे.
