सहकारनगर पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगार केले जेरबंद
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : तळजाई टेकडीवर मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांवर लुटण्याच्या तयारीत असलेले तीन सराईत गुन्हेगार सहकारनगर पोलिसांनी जेरबंद केले आहेत.त्यामुळे पहाटेच्या वेळी वृद्ध नागरिकांना लुटण्याचा या चोरट्यांचा प्लॅन पोलिसांनी उधळून लावला आहे.
गुरुवारी (६ जून) रोजी रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांनी ही कारवाई केली केली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे सहकारनगर पोलीस स्टेशनचे हद्दीत चैन चोरी, मोबाईल चोरी, घरफोडी, इतर मालमत्तेविरुध्द गुन्हे घडु नये त्यास प्रतिबंध करुन कायदा व सुव्यवस्था पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व नवनाथ शिंदे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, बिकानेर चौकाकडुन तळजाई मंदीराकडे जाणारे रोडवरील सदु शिंदे स्टेडीअमचे पुढे व सेल्फी पाँईटचे अलीकडे रस्त्याचे कडेला अंधारात काही इसम नागरीकांना लुटण्यासाठी दबा धरुन बसले आहेत.त्यांच्याकडे लोखंडी हत्यार, लाकडी बांबु वगैरे हत्यारे आहेत.
ही माहिती वरिष्ठांना कळवुन त्यांच्या परवानगीने तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे व तपास पथकातील स्टाफ बातमीप्रमाणे बातमीच्या ठिकाणी जावुन वाहने पार्क करुन थोडे अलीकडे आडोशास थांबुन बॅटरीच्या उजेडाने पाहणी केली.
तेथे पाच ते सहा इसम अंधारात लपुन बसुन एकमेकांशी हळु आवाजात बोलताना दिसुन आले. खात्री होताच पहाटे ०४.४५ वा. सदर ठिकाणी छापा टाकुन तेथे हजर असलेल्या इसमांना ताब्यात घेत असताना अंधाराचा फायदा घेवुन दोन जण तेथुन पळुन गेले व तिन जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले.
त्यांना अमर अनंत काथवटे,( वय २६ वर्षे, रा.५४/२ आण्णाभाऊ साठे नगर अरण्येश्वर पुणे), ऋषीकेश उर्फ ऋषी राजु शिंदे (वय २६ वर्षे, रा.५४/२ अण्णाभाऊ साठे नगर, अरणेश्वर पुणे), अभिजीत श्रावण चंदनशिवे, (वय २६ वर्षे, रा.बी/१०४/२ व्हिआयटी कॉलेजजवळ अप्पर इंदीरानगर बिबवेवाडी पुणे )अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातुन १ लोखंडी हत्यार, स्प्रे, लाकडी बांबु. मोबाईल व अॅक्टीव्हा गाडी असा मुद्देमाल जप्त कण्यात आला आहे.
सदर आरोपी यांच्याविरुध्द खुनाचा प्रयत्न, दरोडा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दंगा, मारामारी, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींवर यापुर्वी मकोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
अधिक तपास करता तळजाई मंदिराजवळील टेकडीवर पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉक साठी येणा-या नागरिकांना लुटण्यासाठी एकत्र जमलो असल्याचे त्यांनी सांगीतले. त्यांच्याविरुध्द सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास युवराज पोठरे, पोलीस उप निरीक्षक, सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहेत. सदरची कामगीरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नंदिनी वंग्याणी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकारनगर पोलीस स्टेशनसुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे, सहा. पोलीस उप निरीक्षक बापु खुटवड्, पोलीस अंमलदार अमोल पवार, नवनाथ शिंदे, सागर सुतकर, किरण कांबळे, बजरंग पवार, महेश मंडलिक, अमित षद्द्माळे, विशाल वाघ, सागर कुंभार यांनी केली आहे.
