प्रतिबंधित गुटखा,पान मसाला जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
लोणावळा : लोणावळा शहरातील गुटखा विक्री करणाऱ्या १४ पान टपरीधारकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा, प्रतिबंधित मसाला पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामुळे अवैध गुटखा विक्री करणाऱ्या व्यावसायीकांचे धाबे दणाणले आहे. सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांना गोपनीय बातमीदारामार्फत लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणा-या पान टप यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, पान मसाला विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती.
त्यांनी तातडीने पोलीस स्टाफ तसेच लोणावळा शहर पोलीस स्टेशनकडील पोलीस स्टाफसह लोणावळा शहरातील विविध ठिकाणी असलेल्या पानटपरी धारकांवर छापा टाकला. यावेळी १) रवि शंकर बुगडे (वय२४ रा. गवळीवाडा, लोणावळा ता. मावळ जि.पुणे )(दिलखुश पान शॉप गवळीवाडा) २) अतुल बळीराम लोखंडे (वय ४२ रा. गवळीवाडा, किरण पेढोलपंपाशेजारी तुंगार्ली, लोणावळा ता. मावळ जि.पुणे) (रुद्रांश पान शॉप) ३). कृष्णा संदीप गवळी (वय १९ रा. गवळीवाडा, लोणावळा ता. मावळ जि.पुणे) (कृष्णा पान शॉप) ४) शोयब नईम खान (वय २५ रा.११२. म्हाडा कॉलनी लोणावळा ता. मावळ जि.पुणे) (श्रीराम पान शॉप) ५) मनोजकुमार महावीर प्रसाद भारव्दाज (वय ३० वर्षे रा. श्रीकृपा अपार्टमेंट प्लॉट नं. २८ नांगरगाव लोणावळा ता. मावळ जि.पुणे (कुणाल पान शॉप) ६) उमर मोहमद एम.बी. (वय ४८ रा. मराठी शाळेजवळ गवळीवाडा लोणावळा ता. मावळ जि. पुणे (इन्टरवल पान शॉप) ७) मोहम्मद एकलास खान (वय ३४ रा.१०२. जी-वाई, लोणावळ्ळा ता. मावळ जि.पुणे (केजीएन पान शॉप) ८) संजय कान्ह सोनवणे (वय ६० वर्षे रा. अदित्तय सोसायटी फ्लंट नं. ५३ भांगरवाडी लोणावळा ता मावळ जि पुणे) (संजय पान शॉप) ९). अशोक गुंडू पुजारी (वय ५६ वर्षे रा. व्दारकामाई सोसायटी फ्लॅट नं. ए १ लोणावळा ता. मावळ जि.पुणे )(गणेश पान शॉप) १०), शकील अख्तर रईससुद्दीन शेख (वय १९ वर्षे रा. रुम नं. १५ हुडको कॉलनी लोणावळा ता. मावळ जि.पुणे) (एकविरा पान शॉप) ११) मोहम्मद हसिव शरीफ मन्सुरी (वय ३८ रा. विष्णु अजगेकर यांचे घरी भाडयाने, इंदीरानगर लोणावळा ता. मावळ जि.पुणे (श्री स्वामी समर्थ पान शॉप) १२) यासीन मोहम्मद अब्दुल रेहमान (वय २७ रा. राममंदिर शेजारी गवळीवाडा लोणावळा ता. मावळ जि. पुणे (विग ५ पान शॉप) १३) अब्दुल रहिमान इब्राहिम (वय ३५ रा. पिंगळे यांचे भाडयाचे घरात वलवण लोणावळा ता. मावळ जि. पुणे (रॉयल पान शॉप) १४) वसुद्दीन सिराजउद्दीन खान (वय ३६ वर्षे रा. सनाभाभी यांचे खोलीमध्ये भाडयाने नेताजीवाडी खंडाळा ता. मावळ जि. पुणे (वसीम पान शॉप) यांच्या कडे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला वेगवेगळ्या कंपन्यांचा सुगंधीत तंबाखूजन्य गुटखा, पानमसाला असा एकुण १,०८,७७२/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आला.
पोलिसांनी तो जप्त केला आहे. सर्व टपरी धारकांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही धडाकेबाज कारवाई पंकज देशमुख पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण व अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग लोणावळा सत्यसाई कार्तिक यांनी व त्यांच्याकडील पोलीस पथक तसेच लोणावळा शहर पोलीसांनी केली आहे.
