६ आरोपीना अटक , ३,३९,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : येरवडा पोलिसांनी ५ गुन्हे उघडकीस आणले असून सहा आरोपींना अटक करून ३,३९,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
चोरीचे मोबाईल विकणारे अटकेत येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, संभाजी चौक येरवडा येथे चोरी करणारे संशयीत आरोपी हे चित्रा चौक येरवडा पुणे येथे चोरी केलेले मोबाईल विक्रीसाठी आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले. तपास पथक अधिकारी पोलीस उप-निरीक्षक स्वप्निल पाटिल व पोलिसांनी यांनी तेथे जावून दोन संशयीत आरोपिना पळून जात असताना पकडले.
साबीर अहमद खान (वय २६, रा. येरवडा पुणे) व बालाजी मोहन मिसाळ (वय २१, रा. येरवडा) अशी त्यांची नावे आहेत. आरोपींना अटक करून गुन्हयातील चोरीस गेलेले १,६६,०००/- रु. किंमतीचे ४ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
मोटार चोर पकडला येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना तपास पथकाचे पोलीस अंमलदार अनिल शिंदे, प्रशांत कांबळे, विठ्ठल घुले, नटराज सुतार, दत्तात्रय शिंदे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कल्याणीनगर येथून गाडी चोरी करणारा संशयीत आरोपी हा उरुळी देवाची येथे आला आहे.
माहिती मिळताच तपास पथक अधिकारी पोलीस उप-निरीक्षक स्वप्निल पाटिल व पोलीस अंमलदार अनिल शिंदे, तुषार खराडे, प्रशांत कांबळे, दत्तात्रय शिंदे, नटराज सुतार, विठ्ठल घुले यांनी तेथे जावून संशयीत इसमांस पकडले. त्यांस ताब्यात घेवून नाव पत्ता विचारता अनिकेत शंकर कसबे (रा. उरुळी देवाची पुणे) असल्याचे सांगितले.
हा गुन्हा त्याने इतर २ साथीदार ओंकार मच्छिद्र पवार (वय २४ , रा. ताडीवाला रोड पुणे) व सोहेल पिरसाहब शेख (वय २२ , रा. मांजरी पुणे) यांचेसमवेत केल्याने त्यांना अटक करण्यात आली. त्यांचेकडून गुन्हयातील चोरीस गेलेली १५,००० रु. किंमतीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.
सदर आरोपींकडून एकूण १,७३,०००/- रु. किंमतीचा गुन्हयात चोरीस गेलेल्या ३ मोटार सायकल व गुन्हयात वापरलेल्या २ मोटार सायकल अशा एकूण ५ मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, आरती बनसोडे, व, पोलीस निरीक्षक. संतोष पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक स्वप्निल पाटील, श्रेणी पोलीस उप निरीक्षक प्रदिप सुर्वे, पो. अंमलदार गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, कैलास डुकरे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, नटराज सुतार यांनी केलेली आहे.
