• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 15, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

रेलिंग नसल्याने पंधरा फुट खाली पडल्याने महिलेचा मृत्यू

June 8, 2024
0
8 6 24 2
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यावर गुन्हे दाखल करा

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

भूम : भूम नगर परिषदेमार्फत शहरातील गोलाई चौकात छत्रपती संभाजी महाराज शॉपिंग सेंटरमध्ये पायऱ्याच्या बाजूला रेलिंग नसल्याने पंधरा फुट खालीपडल्याने महिलेचा मृत्यू झाला. यामहिलेच्या मृत्यूला सर्वस्वी नगरपरिषद जबाबदार असुन नगरपरिषद अभियंता मुख्याधिकारी व कंत्राटदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली आहे.

नगर परिषदेमार्फत शहरातील गोलाई चौकात छत्रपती संभाजी महाराज शॉपिंग सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. शॉपिंग सेंटर बंद असताना खाली तळमजला बांधण्यात आला. व पहिल्या मजल्यावर व्यापारी गाळे बांधण्यात आले.

गुरुवारी (दि.६) संध्याकाळी भूम शहरात राहणारी हिराबाई पोत्रे (वय अंदाजे 65 ते 70 वर्ष) कॉम्प्लेक्स मध्ये जात असताना पायऱ्याच्या बाजूला रेलिंग नसल्याने पंधरा फूट खाली पडल्या. तेथील व्यापाऱ्यांनी त्यांना तात्काळ भूमच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

पुढील उपचारासाठी त्यांना धाराशिव येतील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूला सर्वस्वी नगरपरिषद जबाबदार असुन नगरपरिषद अभियंता मुख्याधिकारी व कंत्राटदार यांनी शॉपिंग सेंटर बांधत असताना नागरिकाच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली नाही.

15 फूट तळमजला असतानाही त्या ठिकाणी कोणतीही रेलिंग बांधण्यात आलेली नाही. या अगोदरही एका अज्ञात व्यक्तीचा वरून पडून मृत्यू झालेला होता. याबाबतीत वेळोवेळी तक्रारी करण्यात आलेल्या आहेत.

जो तळमजला बांधण्यात आलेला आहे तो बेकायदेशीर असून शासनाच्या पैशाची उधळपट्टी करून अनाधिकृतपणे बांधण्यात आलेला आहे. तसेच सदरील अनधिकृत मजल्याच्या वर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही सोय करण्यात आलेली नाही. त्याच कारणाने एका निष्पाप वृद्ध महिलेचा जीव गेलेला आहे.

अर्धवट असणाऱ्या इमारतीचे हस्तांतरण करून घेतल्यामुळे व तसेच सदरील अर्धवट असणारी इमारत हस्तांतरण साठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र देणारे नगर अभियंता व संबंधित ठेकेदार यांच्या चुकीमुळे गेलेला आहे.

त्यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. इमारतीचे अर्धवट काम असताना हस्तांतरण करून घेणारे तत्कालीन मुख्याधिकारी, आणि संबंधित नगरपरिषद अभियंता यांनी ही इमारत व्यापाऱ्यांसाठी खुली केल्यामुळे महिलेला जीव गमवावा लागला आहे.

या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या नगरपरिषद अभियंता, नगरपरिषद मुख्याधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन भूम शहर सर्वपक्षीय यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी भूम यांच्यामार्फत जिल्हाधिकारी धाराशिव यांना देण्यात आलेले आहे.

या निवेदनावर काँग्रेस तालुका अध्यक्ष माजी नगरसेवक रुपेश आप्पा शेंडगे, युवा नेते आबासाहेब मस्कर, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष चंद्रमणी गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष विनोद नाईकवाडी, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विलास शाळू, युवक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष ऍड सिराज भाई मोगल, एडवोकेट पाशा शेख, अमोल सुरवसे,महादेव जाधव, गणेश साठे, सचिन बारगजे, शंकर खामकर, आधी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

8 6 24 2
Download

Latest Articles

वाहतूक नियमभंग करणाऱ्यांकडून ४ दिवसांत १ कोटींची दंडवसुली

वाहतूक नियमभंग करणाऱ्यांकडून ४ दिवसांत १ कोटींची दंडवसुली

February 14, 2026
श्रीरामपूरमधील दादा वामन जोशी प्रशालेतील घटना निंदनीय

श्रीरामपूरमधील दादा वामन जोशी प्रशालेतील घटना निंदनीय

February 14, 2026
बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कारवाई

बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कारवाई

February 14, 2026
हॉटेल कॉनरॉडच्या फायनान्स संचालकाला २० लाखांचा गंडा

शेअर मार्केट गुंतवणुकीत ज्येष्ठ नागरिकाची २२ कोटींची फसवणुक

February 14, 2026
कारच्या काचा फोडून दोघांवर वार करून गुंडांनी पसरवली दहशत

कारच्या काचा फोडून दोघांवर वार करून गुंडांनी पसरवली दहशत

February 14, 2026
Load More
Previous Post

येरवडा पोलिसांनी ५ गुन्हे आणले उघडकीस

Next Post

येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंद्यांसाठी किर्तन सोहळा उत्साहात

Recent News

वाहतूक नियमभंग करणाऱ्यांकडून ४ दिवसांत १ कोटींची दंडवसुली

वाहतूक नियमभंग करणाऱ्यांकडून ४ दिवसांत १ कोटींची दंडवसुली

February 14, 2026
श्रीरामपूरमधील दादा वामन जोशी प्रशालेतील घटना निंदनीय

श्रीरामपूरमधील दादा वामन जोशी प्रशालेतील घटना निंदनीय

February 14, 2026
बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कारवाई

बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कारवाई

February 14, 2026
हॉटेल कॉनरॉडच्या फायनान्स संचालकाला २० लाखांचा गंडा

शेअर मार्केट गुंतवणुकीत ज्येष्ठ नागरिकाची २२ कोटींची फसवणुक

February 14, 2026
कारच्या काचा फोडून दोघांवर वार करून गुंडांनी पसरवली दहशत

कारच्या काचा फोडून दोघांवर वार करून गुंडांनी पसरवली दहशत

February 14, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
वाहतूक नियमभंग करणाऱ्यांकडून ४ दिवसांत १ कोटींची दंडवसुली

वाहतूक नियमभंग करणाऱ्यांकडून ४ दिवसांत १ कोटींची दंडवसुली

February 14, 2026
श्रीरामपूरमधील दादा वामन जोशी प्रशालेतील घटना निंदनीय

श्रीरामपूरमधील दादा वामन जोशी प्रशालेतील घटना निंदनीय

February 14, 2026
बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कारवाई

बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कारवाई

February 14, 2026
हॉटेल कॉनरॉडच्या फायनान्स संचालकाला २० लाखांचा गंडा

शेअर मार्केट गुंतवणुकीत ज्येष्ठ नागरिकाची २२ कोटींची फसवणुक

February 14, 2026
कारच्या काचा फोडून दोघांवर वार करून गुंडांनी पसरवली दहशत

कारच्या काचा फोडून दोघांवर वार करून गुंडांनी पसरवली दहशत

February 14, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

वाहतूक नियमभंग करणाऱ्यांकडून ४ दिवसांत १ कोटींची दंडवसुली

वाहतूक नियमभंग करणाऱ्यांकडून ४ दिवसांत १ कोटींची दंडवसुली

February 14, 2026
श्रीरामपूरमधील दादा वामन जोशी प्रशालेतील घटना निंदनीय

श्रीरामपूरमधील दादा वामन जोशी प्रशालेतील घटना निंदनीय

February 14, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta