सिंहगडरोड पोलीस ठाण्याची कामगिरी, १७ वाहन चोरीचे गुन्हे उघड
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सिंहगडरोड पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी वडकीनाला भागामध्ये सापळा लावुन वाहनचोरी करणाऱ्या पती पत्नीला अटक करून ०८ चारचाकी व ०९ मोटार सायकली ताब्यात घेतल्या आहेत. एकुण १७ वाहन चोरीचे गुन्हे उघड करुन एकुण १२,७०,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.
गेल्या काही महिन्यापासून वाहन चोरीचे प्रकार वाढले होते. पण चोरटे काही सापडत नव्हते.सिंहगड रोड पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार वाहन चोरीच्या अनुषंगाने तपास करित असतांना तपास पथकातील पोलीस अंमलदार उत्तम तारु, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर यांना माहिती मिळाली की, वाहन चोरी करणारे पुरुष व महिला आरोपी हे वडकीनाला याभागामध्ये रस्त्याचे कडेला एका कारमध्ये बसले आहेत.
खबर मिळताच तपास पथकाचे सपोनि सचिन निकम व पोलीस उप निरीक्षक संतोष भांडवलकर यांनी वडकी नाला परिसरात भागामध्ये सापळा लावुन दोघा संशयीतांना ताब्यात घेवुन अटक केली. त्यांचेकडे चौकशी केली असता आरोपींनी पुणे पोलीस आयुक्तालयातील एकुण १७ दुचाकी व चारचाकी वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
त्यातील चोरी केलेल्या एकुण ८ चारचाकी व ९ दुचाकी वाहने असा मुददेमाल पोलिसांनी जप्त केला आहे.आरोपीकडे अधिक तपास केला असता असे दिसुन आले की, दोघे आरोपी हे नवरा बायको असुन ते पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लॉजवर राहुन दिवसभर टेहळणी करुन रात्रीचे वेळी बाहेर पडुन चारचाकी व दुचाकी वाहने चोरी करत होते.
दोघे पती पत्नी गाडीवर असल्याने कोणालाही संशय येणार नाही अश्या पध्दतीने बेमालुमपणे वाहन चोऱ्या करित होते. परंतु अत्यंत शिताफीने व गोपनीय पध्दतीने सिंहगड रोड पोलीस ठाणे कडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सलग दोन महिने अथकपणे दोघा आरोपींचा मागोवा घेतला आणि आरोपींना वडकी नाला या भागातुन ताब्यात घेतले.त्यांचेकडे चौकशी करुन आरोपींनी चोरलेल्या एकुण ८ चारचाकी व ९ दुचाकी वाहने ही आरोपीने नागपुर, शिर्डी, श्रीरामपुर येथे विकली होती. सदर ठिकाणी जावुन गुन्हयातील एकुण १७ वाहने असे एकुण १२,७०,०००/- किं चा. मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीकडुन सिंहगडरोड चे ५ भारती विद्यापीठ, २ हडपसर, २ कोरेगाव पार्क, २ कोंढवा, समर्थ, बिबवेवाडी, वानवडी, १ वारजे माळवाडी, १ तसेच नागपूर मधील १ असे १७ दुचाकी व चारचाकी वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले आहे. सिंहगडरोड पोलीस स्टेशनच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पुणे शहर, प्रविण पवार, पोलीस सह आयुक्त पुणे शहर. प्रविणकुमार पाटील सो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर संभाजी कदम. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३, पुणे शहर, जगदीश सातव, सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे शहर, विजय कुंभार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, उत्तम तारु, राजु वेगरे, विकास बांदल, अमोल पाटील, विकास पांडोळे, देवा चव्हाण, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, सागर शेडगे, स्वप्नील मगर, विनायक मोहीते, शिरीष गावडे यांच्या पथकाने केली. त्यांचे कौतुक होत आहे.