महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुना रिवरसाइड राउंड टेबल 105 तर्फे फंडवस्ती, रांजणगाव येथे आयटीसी लिमिटेडच्या सीएसआर निधीतून दोन वर्गखोल्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमात PRRT105 चे प्रतिष्ठित सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रसंगी PRRT105 चे चेअरमन परेश लोढा, दिशा लोढा, सचिव यश चौधरी, आयटीसी लिमिटेड सीएसआर निधीचे व्यवस्थापक मुनिश सक्सेना, निवडून आलेल्या महिला सरपंच सुवर्णा ज्ञानेश्वर वायदंडे, उप सरपंच श्रीकांत पाचुंदकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य अशोक डोळके, नेताजी फंड, अनिल दुंडे, निलेडा लांडे, रुपाली फंड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुषार कुटे, सोमनाथ फंड, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुभाष फंड, दारद फंड, अतुल खेडकर, विकास फंड, विनायक खेडकर, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रकल्पाची अंदाजित किंमत 31 लाख रुपये आहे, ज्यामुळे दरवर्षी 100 अतिरिक्त विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे. याशिवाय, PRRT105 ने 50 विद्यार्थ्यांना कला किटचे वाटप करण्यात आले.
ज्यामुळे त्यांच्या सृजनशील विकासाला प्रोत्साहन मिळाले. Freedom Through Education (एफटीई) उपक्रमांतर्गत, राउंड टेबल इंडिया ने आतापर्यंत संपूर्ण भारतात 8000 पेक्षा अधिक वर्गखोल्या बांधल्या आहेत.
