महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ८ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस कायदा (हद्यपार) क. ५५ प्रमाणे पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून त्यांना हद्यपार करण्यात आलेले आहे. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगारांवर परिणामकारक व ठोस अशी कारवाई करणेबाबत आदेश दिलेले होते.
त्यानुसार सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग व वानवडी विभागांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या वेगवेगळ्यां पोलीस स्टेशनकडील सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली. तडीपार करण्यात आलेले गुन्हेगार हे त्यांचे तडीपार कालावधीमध्ये पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्हयामध्ये दिसुन आल्यास तात्काळ पोलीस नियत्रंण कक्ष संपर्क क्र.११२ तसेच जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधुन माहिती कळविण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
