दिड कोटीचा अवैध गुटखा जप्त, गुन्हे शाखेची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गुन्हे शाखा युनिट २ व गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे शहरातील नऱ्हे आंबेगाव येथील भेसळयुक्त गुटखा तयार करणाऱ्या फँक्टरी व गोदामावर छापा टाकला. यावेळी पोलीसांना १,६३,२४,३००/-रु. गुटखा, व डुप्लीकेट गुटखा जप्त करण्यात यश आले आहे.
पुणे शहरामध्ये बेकायदेशिर अवैध धंदयावर गुन्हे शाखेमार्फत कारवाई चालु असताना युनिट २ गुन्हे शाखेकडील सपोनि अमोल रसाळ व त्यांच्या पथकाला गोपनिय माहीती मिळाली की, नऱ्हे आंबेगाव भागात गुटखा व डुब्लीकेट गुटखा तयार करण्याची फॅक्टरी व गोडावुन आहे.
या ठिकाणी माल तयार करुन साठा करुन विक्री केली जात आहे. वरिष्ठ अधिकारी यांनी गुन्हे शाखेकडील ४ पथके तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिले. गुन्हे शाखेकडील पथकांनी अभिनव कॉलेज रोडला, मारुती मंदीराजवळ, खाडेवाडी, नऱ्हे गाव येथे छापा टाकून कारवाई केली व गुटख्याचा मोठा साठा जप्त केला.
यावेळी १) पुष्पेंद्र अकबाल सिंग, (वय २७ वर्षे, रा. मुळगाव महानोरा, जि. उन्नव, उत्तरप्रदेश, सध्या रा. हरि आनंद सोसायटी, फ्लॅट ४१०.४ था मजला, सिध्दी चौक, अभिनव कॉलेज जवळ, नऱ्हे, पुणे, २) सुनिल पथ्थन सिंग, वय ४५ वर्षे, रा. मुळगाव महानोरा, जि. उन्नव, राज्य उत्तरप्रदेश, सध्या रा. हरिआनंद सोसायटी, फ्लॅट ४१०,४ था मजला, सिध्दी चौक, अभिनव कॉलेज जवळ, नऱ्हे, पुणे, ३) मुकेश कालुराम गेहलोत, वय २८ वर्षे, रा. मुळगाव मांडा, ता. मारवाड, जि. पाली, राज्य राजस्थान, सध्या रा. साई किरण अपार्टमेंट, हाऊस नं २, नवले ब्रिज जवळ, आंबेगाव, पुणे, ४) चंदन अजयपाल सिंग, वय ३२ वर्षे, रा. मुळगाव महानोरा, जि. उन्नव, राज्य उत्तरप्रदेश, सध्या रा. हरिआनंद सोसायटी, फ्लॅट ४१०, ४ था मजला, सिध्दी चौक, अभिनव कॉलेज जवळ, नन्हे, यांना अटक करण्यात आली आहे.
मुख्य आरोपीचा व गुन्हयाचा अधिक तपास सपोनि अमोल रसाळ युनिट २ गुन्हे शाखा हे करीत आहेत. सदरची कामगिरी. पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार, सह. पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे १. सुनिल तांबे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे -२. सतिश गोवेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस निरीक्षक जाधव, सपोनि अमोल रसाळ व युनिट २ कडील स्टाफ, पोलीस निरीक्षक रंगराव पवार वाहन चोरी व दरोडा विरोधी पथक १ व त्यांचेकडील स्टाफ, पोलीस निरीक्षक प्रतापराव मानकर, खंडणी विरोधी पथक २ व स्टाफ व सामाजिक सुरक्षा कडील सपोनि राजेश माळेगावे व त्यांचेकडील स्टाफ यांनी केलेली आहे. आरोपींना २० जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
