महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : लायन स्टिक वर्ष २०२४ – २५ वर्षांकरिता लायन्स प्रांत 32 34 डि 1 मध्ये विविध पदांवर लायन्स क्लब बार्शी रॉयलच्या सभासदांची पदाधिकारी म्हणून नुकतीच नेमणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये 3234 D1 च्या कॅबीनेट मध्ये सोलापूर जिल्हा रिजन १ करिता एमजेएफ लायन. राहुल दोशी यांची रिजन चेअरमन पदी निवड झाली आहे.
ला. सुमित जैन (राणावत) यांची रिजन सेक्रेटरी पदी निवड, एमजेएफ. ला. संतोष गुळमिरे यांची डायबिटीज चेअरमन पदी निवड तर ला. गणेश भंडारी यांची डिस्ट्रीक चेअरमन पर्यावरण संवर्धन पदी निवड करण्यात आली आहे.
त्याचबरोबर लायन्स क्लब बार्शी रॉयलच्या अध्यक्षपदी ला. वर्षा गुंदेचा, सचिवपदी ला. अमृता गुंडेवार, खजिनदारपदी ला. राजूल कांकरीया तर प्रथम उपाध्यक्ष म्हणून ला. मंगेश बागुल यांची निवड झाली आहे.
डिस्ट्रीक 3234 D1 चे नवनिर्वाचित प्रांतपाल एमजेएफ. ला. एम के पाटिल यांनी डिस्ट्रीक कॅबीनेट पदाची निवड केली, तर लायन्स क्लब बार्शी रॉयलची पदाधिकारी यांची निवड, माजी प्रांतपाल एमजेएफ. ला. जितेंद्र दोशी यांचा मार्गदर्शनाखाली व क्लबचे पदाधिकरी व सदस्या यांच्या उपस्थितीमध्ये निवड प्रक्रिया पार पडली.
