हडपसरला ईदच्या दिवशीची घटना, आत्महत्या केल्याचा बनाव
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करून पोलिसांना खोटी माहिती देणाऱ्या भावानेच बहिणीचा गळा दाबून खून केला असल्याची धक्कादायक घटना वैदूवाडीत घडली आहे. पोलिसांनी कसून केलेल्या तपासानंतर व शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर ही आत्महत्या नसून खुनाचा प्रकार असल्याचे उघड झाले आहे.आरोपीला अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगल मोडवे यांनी दिली.
ईदच्या दिवशी (१७ जून)बहीण आणि भावाचे घरात भांडणझाले होते. किरकोळ वादातून आणिरागातून ही घटना घडली आहे. भावाने बहिणीचा गळा दाबला, यात तिचा मृत्यू झाला होता. हडपसर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
मात्र, शवविच्छेदनाच्या अहवालात खराप्रकार समोर आल्याने भावावर खूनाच गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. साफिया सुलेमान अन्सारी (वय १६, रा. रिद्धी-सिद्धी अपार्टमेंट, वैदूवाडी, हडपसर) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. शरीक सुलेमान अन्सारी (वय १८) याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.
हडपसर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मंगल मोंढवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जून रोजी ईदनिमित्त साफिया आणि शरीक यांचे आई-वडील बाहेर गेले होते. रात्री अडीचच्या सुमारास झोपण्यासाठी बेडरुममधला बिछाना पाहिजे असल्याने शरीकने साफीया झोपली असलेल्या बेडरुमचा दरवाजा वारंवार ठोकवल्यामुळे साफीया हिला राग आला.
त्यामुळे तिने रागाच्या भरात दरवाजा उघडला. ती घराच्या बाहेर जात असताना, शरीक यांने तिला दोनवेळा बेडरुमध्ये आणले, त्यावेळी साफीया हिने किचनमधील भाजी कापायाचा चाकू आणून त्याला मारण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी शरीकने रागाच्या भरात बहिणीचा गळा दाबला; यात तिचा मृत्यू झाला. त्याने ओढणीच्या साह्याने तिला फॅनला लटकावून आत्महत्या केल्याचा बनाव केलाहोता. मात्र पोलिसांच्या कुशल तपासामुळे व शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर आत्महत्या नसून खुनाचा प्रकार उघड झाला आहे.
