महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : येथील सामाजिक सेवा कार्याच्या क्षितिजावर अग्रेसर असणाऱ्या लायन्स क्लब बार्शी टाउनच्या अध्यक्षपदी युवा उद्योजक एमजेएफ ला. महावीर कदम यांची निवड झाली आहे. सचिव पदी ला. हेमंत जमदाडे, तर खजिनदारपदी ला.किरण आवटे यांची निवड झाली आहे. ही निवड 2024 – 25 वर्षासाठी आहे.
ला. महावीर कदम हे लायन्स क्लब बार्शी टाउन मध्ये गेली एक दशकापासून सक्रिय आहेत. त्यांचा सामाजिक कार्याचा अनुभव लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. महावीर कदम हे व्यापार उद्योग क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तिमत्व असून सध्या ते भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्षपद ही भूषवत आहेत.
अध्यक्षपदी निवड झालेलेमहावीर कदम हे या क्लबच्या वाटचालीतील 26 वे अध्यक्ष आहेत. त्यांना व्यायाम, शरीर सौष्ठव, क्रीडा क्षेत्राची विशेष आवड असून, त्यांनी यापूर्वी आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन मॅरेथॉन आदि स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे.
महावीर कदम यांनी या निवडीनंतर आपण सर्व सदस्यांना बरोबर घेऊन आगामी वर्षात कृषी व व्यापार प्रदर्शन, सामुदायिक विवाह सोहळा, सायकलिंग स्पर्धा, व मॅरेथॉन स्पर्धा, अन्नदान विषयक उपक्रम, रस्ते सुरक्षा अभियान, ग्रामीण तथा शहरी भागात आरोग्य शिबिरे, व्यक्तिमत्वविकास, वृक्षारोपण, रक्तदान, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आदि उपक्रम घेणार असल्याचा मानस व्यक्त केला.
याशिवाय आयपीपी ला.डॉ.योगेश कुलकर्णी, जॉइंट सेक्रेटरी, ला. डाॅ. राहुल मांजरे, जॉइंट ट्रेझरर ला. प्रवीण कस्पटे, प्रथम उपाध्यक्ष ला. रवी राऊत, द्वितीय उपाध्यक्ष ला. आदित्य कोठारी, तृतीय उपाध्यक्ष ला. हिम्मत भानुशाली टेमर ला.डॉ. नवदीप लोकरे, टेल ट्विस्टर ला. चंद्रकांत जाधव, जी एम टी ऑफिसर ला. प्रकाश फुरडे, जीएलटी ऑफिसर ला. रवी प्रकाश बजाज, जीएसटी ऑफिसर ला.डॉ. कैवल्य गायकवाड, क्लब ऍडमिनिस्ट्रेटर एमजेएफ. ला. ॲड वासुदेव ढगे, पी आर ओ एमजेएफ. ला. अमित इंगोले, मार्केटिंग कम्युनिकेशन ला.निलेश परमार, परमनंट प्रोजेक्ट चेअरमन ला.डॉ. सागर हजगुडे, एल सी आय एफ कोऑर्डिनेटर ला. विनोद बुडुख, लायन क्वेस्ट चेअरमन. ला. अमित कटारिया, आयटी चेअरमन ला. भूषण कदम, त्याच प्रमाणे डायरेक्टर्स एमजेएफ ला. अतुल सोनीग्रा, ला. अजित देशमुख, ला. शंभुलाल भानुशाली, ला.डॉ. हरीश कुलकर्णी, ला.डॉ. गजानन शेटे, ला. राजाभाऊ काळे, ला. धनंजय ठोंगे, ला.डॉ. मिलिंद सलगर, ला. उमेश चव्हाण, ला. आनंद सोमाणी हे या वर्षासाठी काम पाहणार आहेत. या क्लबचा पदग्रहण समारंभ 14 जुलै रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह येथे होणार आहे.
