एकलहरे गावच्या हद्दीतील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने भरधाव कार चालवून एका तरुणाला चिरडल्याची घटना घडली आहे.
खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयूर मोहिते पाटील याने जुना पुणे- नाशिक महामार्गावर एकलहरे गावच्या हद्दीत शनिवारी (दि. २२) रात्री साडेनऊच्या सुमारास भरधाव कार चालवून एका तरूणाला चिरडले.
फॉर्च्यूनरने विरुद्ध दिशेने ओव्हरटेक करत येत दुचाकीला धडक दिल्याने ओम ऊर्फ बंटी सुनील भालेराव (वय १९, रा. कळंब सहाने मळा) हा तरुण ठार झाला आहे, अपघातानंतर मोहिते मदत न करता पळ काढण्याच्या तयारीत होता.
मात्र, तरुणांनी त्याला रोखले आहे. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले आहे. खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयूर साहेबराव मोहिते (रा. मोहितेवाडी शेलपिंपळगाव) हा त्याच्या फॉर्च्यूनर गाडी (एमएच १४ केजे ७५५७) ही घेऊन कळंब बाजूकडून मंचर बाजूकडे भरधाव चालला होता.
त्याचवेळी कळंब गावच्या सहानेमळ्यात राहणारा ओम ऊर्फ बंटी सुनील भालेराव हा मोटारसायकलवरून मंचर बाजूकडून कळंब गावाकडे चालला होता. जुना पुणे-नाशिक महामार्गावर एकलहरे गावच्या हद्दीत पिकअप गाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मोहिते यांच्या फॉर्च्यूनर गाडीची धडक बसली.
एकलहरे, ता. आंबेगाव येथे दुचाकीला धडक दिली. या अपघातात ओम सुनील भालेराव (वय २५, रा. कळंब, ता. आंबेगाव) यांचा जागीच मृत झाला. शनिवार, दिनांक २२ रोजी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.
अपघातानंतर चालक मयुर मोहिते पाटील हे फरार झाला असा आरोप स्थानिकांनी केला होता यावर माझा पुतण्या मयूर मोहिते हा कुठेही पळून गेलेला नाही, असे आमदार मोहिते यांनी स्पष्ट केले. दुचाकी चालक ओम सुनील भालेराव हा रस्त्याच्या कडेला फेकला गेला.
अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर मोहिते हा पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, एका स्थानिक ग्रामस्थांनी त्याचे वाहन फॉर्च्यूनर गाडीला आडवे लावले, तसेच चित्रीकरण केले. काही तरुण जखमी ओम भालेराव यांच्या मदतीला धावले.
मात्र, मोहिते गाडीतून उतरण्यास तयार नव्हता. उपजिल्हा रुग्णालयात नेले उपचारापूर्वीच ओम् मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे. या अपघातात ठार झालेला ओम हा एकुलता एक मुलगा आहे. पश्चात आई-वडील, बहीण परिवार आहे.
