महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गुंडांच्या टोळक्याने लेबर कॉन्ट्रॅक्टरला बेदम मारहाण केल्याची घटना भोसरी येथील उड्डाणपुलाच्या खाली मंगळवारी दि. २५ दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली आहे.
अरबाज पठाण (रा. भोसरी), शदाब पठाण, सायबाज पठाण, यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश ओव्हाळ हे त्यांच्या मित्राशी चर्चा करत होते.
शदाब पठाण याने फिर्यादी गणेश ओव्हाळ यांच्या ऑफिस मधील विष्णू शिंदे यांच्यासह पत्त्यामध्ये तसेच ड्रीम इलेव्हनमध्ये तब्बल तीन लाख रुपये घालवले, असे गणेश ओव्हाळ यांनी त्यांच्या मित्राला सांगितले.
ही चर्चा सुरू असताना अरबाज पठाण याने फिर्यादी गणेश ओव्हाळ यांचे बोलणे ऐकले. त्यावेळी त्याने शदाब व सायबाज यांना बोलावून घेत फिर्यादी गणेश ओव्हाळ यांना शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच हाताने व दगडाने मारहाण करीत त्यांना जखमी केले.
