१३ लाखाचे १२० मोबाईल व ०३ लॅपटॉप जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड व परिसरामध्ये मोबाईल व लॅपटॉप चोरी करणाऱ्या आंतरराजीय टोळीचा स्वारगेट पोलिस स्टेशनकडील तपास पथकाने पदार्फाश करुन एकुण १३ लाख रुपये किंमतीचे १२० मोबाईल व ०३ लॅपटॉप १३ लाख रुपये किंमतीचे १२० मोबाईल व ०३ लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त केलाआहे.
स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर हद्दीमधील स्वारगेट एसटी स्टॅन्ड व पीएमपीएल बस स्टॅन्ड परिसरामध्ये अज्ञात चोरटे हे प्रवाशांची बसमध्ये चढण्यासाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेवुन त्यांचेमोबाईल चोरी करीत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
स्वारगेट पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले व तपास पथकातील पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, फिरोज शेख व सुजय पवार यांनी स्वारगेट एसटी स्टॅन्ड परीसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासुन तांत्रीक विश्लेषनाद्वारे माहिती मिळवली. पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, फिरोज शेख व सुजय पवार यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम हा स्वारगेट एसटी स्टॅन्डमध्ये संशयितरित्या फिरत आहे.
त्यावरुन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार सापळा थांबले. एका इसमाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने इम्रान ताज शेख, (वय ३१ वर्षे, धंदा चालक, रा. असरफ नगर गल्ली नं.०५ कोंढवा पुणे) यास ताब्यात घेतले. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने स्वारगेट परिसरामध्ये १०० ते १५० मोबाईल चोरी केले असल्याचे सांगितले.
त्यास दाखल गुन्हयात अटक करुन त्याचेकडे तपास केला असता त्याने सदर मोबाईल ऊसामा शफिक शेख(वय २२ वर्ष, धंदा व्यवसाय, रा. गल्ली नं.०५ सय्यदनगर, हडपसर) पुणे यास विक्री केले असल्याचे सांगितले. तसेच आरोपी इग्रान शेख वरचोरीचे एकुण १० गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.
तद्नंतर ऊसामा शेख याचा शोध घेवुन त्यास अटक केली असता त्याने सदर मोबाईल खरेदी करुन त्याचेवर सॉफ्टवेअर मारुन सदर मोबाईल पुढे मुंबई येथील एजंट आबिद मुकीम पटेल (वय २३ वर्षे रा. प्लॉट ५२, रुम नं.५७, गेट नं ०७, मालाड मालवणी मुंबई) व अख्तर अली रबियल खान (वय ३४ वर्षे धंदा व्यवसाय रा. रुम नं ११८ पहिला मजला एनसीसी प्लॉट नं ५९ गेट नं ०७ मालवणी मालाड वेस्ट) यांना विक्री केले असल्याचे सांगितले.
मुंबई येथे जावुन सदर आरोपींचा शोध घेवुन त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन सदर आरोपीतांकडुन एकुण १२ लाख रुपये किंमतीचे एकुण १२० वेगवेगळया कंपन्यांचे मोबाईल व ०१ लाख रुपये किंमतीचे वेगवेगळया कंपनीचे ०३ लॅपटॉप तसेच सॉफ्टवेअर मारण्याचे एकुण ०३ डिव्हाईस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्हयांमध्ये आणखीन ०३ आरोपी सहभागीअसुन त्यांचीमोठी आंतरराजीय टोळी असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले स्वारगेट पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कामगिरी अमितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर. प्रविण पवार सो, सह-आयुक्त, प्रविणकुमार पाटील अप्पर पोलीस आयुक्त. स्मार्तना पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ २., नंदिनी वग्यानी सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गीता बागवडे यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, हर्षल शिंदे, फिरोज शेख, सुजय पवार, संदीप घुले, दिपक खंदाडअनिस शेखशिवा गायकवाड, रमेश चव्हाण, प्रविण गोडसे यांनी एकत्र मिळुन केली आहे.
