महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भुम : संत तुकोबांच्या वारीमध्ये आकुर्डी स्थित डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहभाग घेत वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्याचा अनोखा उपक्रम राबविला.
विठूरायाच्या गजरात तल्लीन होत वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना सततचे चालणे, अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी, सकाळचे गार वारे, वेगवेगळ्या ठिकाणच्या मुक्कामादरम्यान होणारा पाणी बदल इत्यादी बाबीं मुळे छोट्या मोठ्या शारीरिक तक्रारी निर्माण होतात, याच गोष्टीचा विचार करीत यावर्षी सुद्धा महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना ओटिसी औषध वाटप व त्यासोबतचे समुपदेश केले.
हा उपक्रम आकुर्डी ते पिंपरी दरम्यान राबवण्यात गेला. या उपक्रमाची विशेष बाब म्हणजे, ही सर्व औषधी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी रोहित कटारिया, धीरज सुराणा आणि युगल ओसवाल यांनी मोफत उपलब्ध करून दिली.
वारीमध्ये सहभागी होत विठुरायाच्या जयघोषा सोबत कर्मचारी सोबत महाविद्यालयाचे कर्मचारी व विद्यार्थी यांनी आपल्या व्यावसायिक शिक्षणाचा उपयोग करीत वारकऱ्यांना अनोखी सेवा दिल्या बद्दल या उपक्रमाचे उपस्थित सर्वांनीच कौतुक केले.
डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालय नेहमीच अभिनव उपक्रमांद्वारे शिक्षणाधारीत समाजसेवा करण्याचा प्रयत्न करून आपल्या मुलांना तज्ञ फार्मसिस्ट सोबत आदर्श नागरिक बनवण्याचा प्रयत्न करीत असते व वारीमधील औषध वाटप तथा समुपदेशन हा त्याचाच एक भाग असल्याचे मत प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी व्यक्त केले.
या उपक्रमासाठी प्रा. मुकेश मोहिते, प्रा. आशिष चिंबाळकर, प्रा. पल्लवी चौधरी आणि प्रा. रामदास शिंदे व विद्यार्थी प्रतिनिधी वेदांग जाधव, जयंतीका पवार, परमेश्वर पालवे यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी संकुल संचालक अमित विक्रम, विश्वस्त तेजस पाटील व संकुल अध्यक्ष सतेज पाटील यांनी फार्मसी महाविद्यालयाचे अभिनंदन केले.
