आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुणे लोहमार्ग पोलीस भरती ७ जुलै ला लेखी परीक्षा

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : लोहमार्गपोलीस, पुणे या आस्थापनेवर पोलीस भरती शारीरिक मैदानी चाचणी परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा ही ए.के.न्यू लॉ अकॅडमी अॅन्ड पीएचडी (लॉ) रिसर्च सेंटर, २३९० के. बी. हिदायतुल्ला रोड, आझम कॅम्पस, पुणे – ४११००१ या ठिकाणी दि. ०७ जुलै २०२४ रोजी आयोजीत केली आहे.

पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे या आस्थापनेवर पोलीस भरती २०२२-२३ करीता रिक्त असलेल्या ५० पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी, गुणवत्ता यादी, जात प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणानुसार १:१० या प्रमाणे या कार्यालयाचे https://punerailwaypolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत आलेली आहे.

शारीरिक मैदानी चाचणी परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी सकाळी ०७.०० वा. नियोजीत ठिकाणी उपस्थित रहावे. परीक्षेसाठी येताना सोबत शारीरिक चाचणी दरम्यान या कार्यालयाकडून देण्यात आलेले ओळखपत्र व महाआयटीकडून आपणास दिलेले प्रवेशपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. अशी माहिती तुषार दोषी पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे यांनी दिली.

get_footer();