आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दहा लाखाची रक्कम ट्रान्स्फर करून फसवणुक

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : तुमच्या बँक खात्यामधुन मनी लाँड्रींग झाले आहे असे सांगुन बँक खाते पडताळण्याच्या बहाण्याने फिर्यादीची कोणतीही परवानगी न घेता १०,६०,०००/- ट्रान्सफर करून घेतल्याची घटना फुरसुंगी परिसरात घडली आहे.

या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अनोळखी इसमाने फिर्यादीशी मोबाईलवर संपर्क साधला व तुमच्या खात्यातून मनी लाँड्रींग झाले आहे असे सांगितले.

त्यामुळे फिर्यादी नेत्यांच्या खात्याची पडताळणी करण्यास सांगितले. ते करताना आरोपीने त्यांच्या खात्यातील रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वळती करून घेतली आहे. हा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगल मोढवे करीत आहेत.

get_footer();