हडपसर पोलिसांची छत्रपती संभाजीनगर मध्ये कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : हडपसर पोलिसांच्या कस्टडीमधून पलायन केलेल्या महिलेस हडपसर पोलिसांच्या तपास पथकाने २४ तासाच्या आत छत्रपती संभाजीनगर येथून नामे जेरबंद केले आहे.
हडपसर पोलिसांच्या कस्टडीमधून पलायन केलेल्या महिलेस हडपसर पोलिसांच्या तपास पथकाने २४ तासाच्या आत छत्रपती संभाजीनगर येथून जेरबंद केले आहे.
धुरपता अशोक भोसले(. वय ३१ रा. टाकळी ता. सिल्लोड जि. औंरगाबाद) हिने पालखी सोहळ्या दरम्यान सोनसाखळी चोरी केल्याने पकडण्यात आले होते.
या गुन्ह्यात दिनांक ०२ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. दिनांक दि.०३जुलै रोजी तपासकामी विश्रामबाग लॉकअप येथून या महिलेला काढून हडपसर पोलीस ठाणे मध्ये आणले होते. त्यादरम्यान ती नजर चुकवुन कायदेशीर रखवालीतुन पळुन गेल्याने तिच्यावर गुन्हादाखल करण्यात आला.
यानंतर पोलीस पथकांनी तिचा शोध सुरु केला. संतोष पांढरे(वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक हडपसर) यांनी वरिष्ठांना अवगत करून नियंत्रण कक्ष पुणे येथे कळवीले होते. तपास पथक अधिकारी सहा पोलीस निरीक्षक, अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक, महेश कवळे, तपास पथक अंमलदार प्रशांत दुधाळ, निखील पवार यांनी पोलीस स्टेशन येथील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करून नमुद महिला ही कोणत्या दिशेस गेली आहे हे निश्चित केले.
अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून पळून गेलेली महिला ज्या रिक्षा मध्ये बसून गेली त्या रिक्षाचालकाचा शोध घेवून त्याचेकडे तपास करता त्याने महिलेस नोबेल हॉस्पीटल मगरपट्टा येथे सोडल्याचे सांगीतले.
तेथून पुढे अधिक सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करता नमुद महिला ही मुंढवा चौकापर्यंत गेल्याचे दिसून आली. त्यामुळे नमुद महिला ही खराडी बायपास येथून तिच्या गावी जावू शकते ही शक्यता धरून तात्काळ वरिष्ठांच्या परवानगीने पोलीस उप निरीक्षक, महेश कवळे, तपास पथक अंमलदार प्रशांत दुधाळ, निखील पवार महिला अंमलदार रंजना पिसे, अर्चना माने यांचे पथक छत्रपती संभजीनगर नगर येथे रवाना झाले.
तपास पथक अधिकारी सहा पोलीस निरीक्षक, अर्जुन कुदळे आणि अंमलदार संदीप राठोड यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणामधून नमुद महिला ही पुणे रेल्वे स्टेशन येथे गेल्याचे निष्पन्न केले. तसेच तिच्याकडे प्रवासाकरीता पैसे नसल्याने ती पुणे रेल्वे स्टेशन ते मनमाड रेल्वे स्टेशन व तेथून छत्रपती संभजीनगर नगर कडे रेल्वेने जाईल ही शक्यता गृहीत धरून पुढे तपासाचे नियोजन केले. अखेर ती संभाजीनगर येथे मिळून आली.
