महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : संकेत विहार, फुरसुंगी येथे वाहनाची तोडफोड करुन दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
४ जुलै रोजी संकेत विहार, मेन रोड फुरसुंगी हडपसर पुणे येथे ४ ते ५ इसमांनी त्यांच्या हातातील लोखंडी शस्त्रांनी वाहनांच्या काचा तोडुन नुकसान करून हवेत कोयता फिरवत दहशत निर्माण केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व सुचनांप्रमाणे तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, तसेच तपास पथक अंमलदार जोतीबा पवार, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे यांनी मिळून तपासाचे नियोजन केले.
घटनास्थळाचे आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले. तपासादरम्यान अनोळखी आरोपींबाबत मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे चंदननगर भागातुन करण निवृत्ती तांबे उर्फ के टी, (वय-१९ वर्षे, रा. दिनकर पठारे वस्ती विशाल दिप सोसायटी समोर, चंदननगर, व दोन विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी त्यांचे साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच आरोपींकडून त्यांनी गुन्हा करताना वापर केलेली दुचाकी व हत्यारे ही जप्त करण्यात आली आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक विनोद पवार हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५. आर राजा, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोनि. (गुन्हे), ती मंगल मोढवे, उमेश गित्ते, यांच्या सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, जोतीबा पवार, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, अमोल दणके, अमित साखरे, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, अमोल जाधव, महिला अंमलदार रंजना पिसे, अर्चना माने यांच्यापथकाने केली आहे.
