महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : लोणीकंद पोलिसांनी तुळापुर रस्त्यावरील हॉटेलवर छापा टाकून पाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ०२ जुलै रोजी तुळापुर रोडवरील, हॉटेल शेतजत्रा या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये जुगार चालू असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती.
लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तपास पथक अधिकारी व अंमलदार यांनी तातडीने छापा टाकला असता सदर ठिकाणी ०८ इसम हे जुगार खेळताना मिळुन आले.
त्यांच्याकडुन रोख रक्क्कम, चार चाकी वाहन व जुगार खेळण्याचे साहीत्य असे एकुण ५,०८,८००/- रु किं.चा मुद्देमाल जागीच जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ पुणे शहर, विजयकुमार मगर, सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, पुणे शहर विठठल दबडे, लोणीकंद पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार तिकोणे, जगताप, ढोणे आसवले, सालके यांनी केली आहे.
