महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कारवाईस विरोध करताना मद्यपी वाहन चालकाने महिला पोलीस अधिकारी व एका पोलीसावरच पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. फरासखाना पोलीस ठाण्यात ही खळबळजनक घटना ५ जुलै रोजी रात्री घडली.
या प्रकरणी पोलीस अंमलदार समीर सावंत यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून, संजय फकिरबा साळवे, (वय ३२, सध्या राहणार. पिंपरी चिंचवड मुळ राहणार. मु पिंपळगांव – शेला, पो. जवखेडा जि. जालना) यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपी दारू पिऊन वाहन चालवत होता.त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्यावर कारवाई सुरु असतांना त्याने विरोध केला. फिर्यादी पोलीस व सोबतच्या महिला पोलीस अधिकाऱ्यावर पेट्रोल टाकण्याचा व लायटरने पेटवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तो असफल केला. हा तपास वंरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ करीत आहेत.
