महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : महिलेला लग्नाचे आमिषदाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच तु पोलिसात गेली तरी मला काही फरक पडत नाही, असे म्हणून महिलेला धमकी दिल्याने कोंढवा पोलिसांनी महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार जून २०२३ ते मे २०२४ या कालावधीत खडकवासला व कोंढवा येथील निर्जन रस्त्यावर कारमध्ये घडला आहे.याबाबत ३५ वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून दिप्तेश पुजारी (वय ३०, रा. वडगाव धायरी) व ३० वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून खडकवासला परिसरात फिरायला नेले. त्याठिकाणी एका लॉजवर नेऊन महिलेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले.
महिलेने त्याला विरोध केला असता तु पोलिस स्टेशनला गेलीस तरी मला काही फरक पडत नाही, मी कोणाला घाबरत नाही, माझ्या खूप ओळखी आहेत, मीतुला बघून घेईन अशी धमकी दिली. पोलिसांनी महिलेसह एकाला ताब्यात घेतले आहे.
