महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : अपर पोलीस महासंचालक, महानिरीक्षक कारागृह अमिताभ गुप्ता व कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, येरवडा स्वाती साठे यांच्या आदेशान्वये येरवडा महिला खुले कारागृह, पुणे येथे केंद्रिय मधुमक्षिका पालन संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, खादी आणि ग्रामउद्योग आयोग यांचे मार्फत महिला बंद्यासाठी मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
येरवडा महिला खुल्या कारागृहातील शेती विभागात काम करणाऱ्या महिला बंद्यासाठी ०५ दिवसांचे मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण देण्यात आले. सीबीआरटी, पुणे या संस्थेचे संचालक बसवराज व सुनिल ढमाळ अधीक्षक येरवडा मध्यवर्ती कारागृह यांच्या हस्ते सहभागी महिला बंद्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
प्रशिक्षणामध्ये एकुण – २२ महिला बंदी सहभागी होत्या. यामध्ये मधुमक्षिकांचा जीवनक्रम, कामाचे स्वरुप, मधुमक्षिका पेटी हाताळणे तसेच मध काढणे व मधुमक्षिका पालनापासून मिळणाऱ्या मध व इतर उत्पादनाचे बाजार पेठेतील विक्री बाबतची संपूर्ण माहिती देण्यात आली. सदरचे प्रशिक्षण हे सीबीआरटी, पुणे येथील प्रशिक्षक बी. के. चव्हाण, आटपाडीकर, राहुल काळे, गौरी चव्हाण, श्रुती कुंभार, साक्षी शिंदे, मल्लमा माळी यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.
सदर कार्यक्रमास सुनिल ढमाळ, अधिक्षक येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे, पल्लवी कदम, उपअधिक्षक येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे, सीबीआरटी संस्थेचे यशवंत डेकाटे, सहाय्यक संचालक, बी. के. चव्हाण, वरिष्ठ कार्यकारी अधिकारी, संजय पुरी, प्रशिक्षण समन्वयक आर. ए. खिलारी महिला तुंरुगाधिकारी – श्रेणी – २, पौर्णिमा पालोदकर, तुंरुगाधिकारी श्रेणी – 2 उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शितल गावडे, कृषी सहाय्य्क यांनी केले.पल्लवी कदम, उपअधीक्षक येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे यांनी आभार मानले. वी. कदम, उपअधीक्षक येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे यांनी आभार मानले.
