मल्टिपल कौन्सिल चेअरमन ला.सुनील देसरडा यांची प्रमुख उपस्थिती
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी येथे लायन्स क्लब बार्शी, लायन्स क्लब बार्शी रॉयल, लायन्स क्लब बार्शी युनिक, लायन्स क्लब बार्शी चेतना या चार क्लब चा एकत्रित पदग्रहण समारंभ संपन्न झाला.
लायन्स क्लब बार्शीच्या अध्यक्षपदी ला. रवींद्र कस्पटे, सचिव ला.राणाप्रताप देशमुख, खजिनदार ला. बालकिशन जाजू, यांची तर लायन्स क्लब बार्शी रॉयलच्या अध्यक्षपदी ला. वर्षा गुंदेचा (खांडवीकर), सचिव पदी ला. अमृता गुंडेवार, खजिनदारपदी ला. राजुल कांकरिया तसेच लायन्स क्लब बार्शी युनिकचे अध्यक्ष ला. शरद इतापे, सचिव ला. अल्ताफ शेख, खजिनदार ला. विराज पाटील तर लायन्स क्लब बार्शी चेतनाच्या अध्यक्ष ला. अमृता कस्पटे, सचिव ला. भाग्यश्री देशमुख, खजिनदार ला. वर्षा साखरे या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
यांचा पदग्रहण सोहळा दिमागदार संपन्न झाला. पदग्रहण अधिकारी म्हणून मल्टिपल कौन्सिल चेअरमन ला. सुनील देसरडा यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी पार पाडला. तसेच लायन्सच्या नूतन सदस्यांना प्रथम उपप्रांतपाल ला. डॉ. वीरेंद्र चिखले यांनी शपथ दिली.
यावेळी माजी प्रांतपाल ला. अशोक मेहता, माजी प्रांतपाल ला. जितेंद्र दोशी (माढेकर), लिओ प्रांतीय सभापती ला. ॲड विकास जाधव, रिजन चेअरमन ला. राहुल दोशी, झोन चेअरमन ला. डॉ. शरद पाटील, माजी प्रांतपाल ला. डॉ. वेंकटेश यजुर्वेदी यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच व्यासपीठावर लायन्स क्लब बार्शीचे माजी अध्यक्ष ला. संदीप नागणे, लायन्स क्लब रॉयलचे माजी अध्यक्ष ला. राजेश खाडे, लायन्स क्लब बार्शी युनिकचे माजी अध्यक्ष डॉ. संदीप पाटील, लायन्स क्लब बार्शी चेतनाचे अध्यक्ष ला. अश्विनी जाधव हे उपस्थित होते.
या प्रसंगी लिओ क्लब बार्शी महाराष्ट्र या नविन क्लबचे उद्घाटन मल्टिपल कौन्सिल चेअरमन ला. सुनील देसरडा यांच्या प्रमुख उपस्थितीत व द्वितीय उपप्रांतपाल राजेंद्र शहा यांच्या हस्ते झाले.
यावेळी लिओ प्रांतीय सभापती ॲड विकास जाधव व लिओचे माजी प्रांताध्यक्ष शुभम उर्फ पवन श्रीश्रीमाळ यांनी नुतन लिओ क्लब च्या पदाधिकारी व सदस्यांचे लिओ पिन देवून स्वागत केले.
तसेच लिओ क्लब बार्शीचे अध्यक्ष अनिकेत जगदाळे, सचिव दत्तात्रय कदम, खजिनदार अजय काळे या पदाधिकाऱ्यांसह संपूर्ण संचालक मंडळाचाही शपथविधी संपन्न झाला. सन 2024-25 या वर्षांमध्ये लायन्सच्या माध्यमातून बार्शी शहरात व तालुक्यात उत्कृष्ट सामाजिक कार्य करावे, सर्वसामान्यांपर्यंत सेवा कार्य पोहोचवणे तसेच एक वर्षाच्या कार्यकाळात सर्व पदाधिकाऱ्यांनी झोकून देऊन काम करावे असे यावेळी ला.सुनील देसरडा यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांची ओळख ला.गहिनीनाथ कदम, ला.विशाल साळुंखे, ला. ज्योती रुगले यांनी करून दिली. यावेळी डॉ.वीरेंद्र चिखले, राजेंद्र शहा, जितेंद्र दोशी, अशोक मेहता, डॉ. व्यंकटेश यजुर्वेदी, ॲड. विकास जाधव, राहुल दोशी, डॉ. शरद पाटील यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले.
यावेळी नूतन अध्यक्षासह, सर्व क्लबचे माजी अध्यक्ष, सर्व क्लबचे सदस्य बहुसंख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला. गणेश भंडारी, ला. गायत्री बंडेवार, ला. डॉ. तनुजा चिकणे यांनी केले तर आभार प्रदर्शन ला. अल्ताफ शेख यांनी मानले.
