आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मुंबई कारागृहात कैद्यासाठी संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई मध्यवर्ती कारागृहात कारागृह सुरक्षेकरीता सी.सी.टी.व्ही. यंत्रणा व कैद्यासाठी सत्संग फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या सहयोगाने संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन अभिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे-1 यांच्या हस्ते पार पडले.

कारागृह विभागाची सुत्रे अभिताभ गुप्ता यांनी हाती घेतल्या पासून कारागृहात विविध नाविन्यपुर्ण उपक्रमास सुरुवात करण्यात आली असून त्या अंतर्गत राज्यातील सर्वच कारागृहामध्ये मोठया प्रमाणात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.

मुंबई मध्यवर्ती कारागृहात देखील एकुण 418 सी.सी.टी.व्ही. कॅमेरे व त्यासंबंधित यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून कारागृहातील कैद्यासाठी 24 तास नजर ठेवणे शक्य होणार आहे.

याचबरोबर कारागृहाची सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यास मदत होणार आहे. उद्घाटन प्रसंगी कारागृहात उल्लेखनीय काम करीत असलेल्या कैदी बांधवांचा प्रशंसापत्र देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अभिताभ गुप्ता यांनी उपस्थित कैदी बांधवांशी सुसंवाद साधुन प्रशासनाने उपलब्ध करुन दिलेल्या सर्व सोई सुविधांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले. योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक, दक्षिण विभाग, यांनी आभार मानले.