आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

धानोरीतील महिलेची आठ लाखाची फसवणुक

Spread the love

पुणे : तुमच्या नावाने ड्रग विदेशात पार्सलमधून जात आहेत.तुम्हाला अटक करावी लागेल, अशी भीती दाखवून धानोरीतील महिलेची ८ लाख रुपयाची फसवणुक करण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत धानोरीतील ३९ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार ही घटना ७ ते १० जुलै दरम्यान घडली. फिर्यादी महिलेस अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर संपर्क केला व दिल्ली कस्टम विभागातील इन्पेक्टर दिल्ली पोलीस व सी. बी. आय. मधुन बोलत असल्याचे सांगितले.

तुमच्या नावाने एक पार्सल दिल्ली ते क्वालांलपुर (मलेशिया) जात आहे असे सांगून, त्याच्यामध्ये १६ पासपोर्ट, ५८ ए. टी. एम. कार्डस आणि एम. डी. एम. ए. ड्रग्जस मिळाले आहे. तसेच त्यांची आयडेन्टी चोरी झाली असुन बँक खाते ओपन करण्यात आले आहे.

त्याचा वापर मनीलॉड्रीग, एक्सट्रॉशन, किडनॅपींग या करीता करण्यात येत आहे, तुम्हाला यातून बाहेर पडायचे असेल तर खात्यात रक्कम जमा करा असे सांगितले. त्यानुसार त्यांनी रक्कम भरली. मात्र नंतर त्यांची फसवणुक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. व त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.