आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची मुंबई येथे बदली

Spread the love

पुणे : अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांची अपर पोलीस महासंचालक, विशेष कृती, मुंबई येथे बदली झाल्याने महाराष्ट्र कारागृह विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी निरोप समारंभ आयोजित केला होता.

कार्यक्रमा करीता जुगणू गुप्ता, डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह, स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक, दक्षिण विभाग, मुंबई नितीन वायचळ, प्राचार्य, दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, तसेच अधीक्षक, सर्व मध्यवर्ती कारागृह व इतर कारागृहांचे अधीक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्तविक नितीन वायचळ यांनी केले.

सत्कारमुर्ती अमिताभ गुप्ता यांचा डॉ. जालिंदर सुपेकर यांनी कारागृह विभागाचे बोधचिन्ह व शाल देऊन सत्कार केला. तसेच जुगणू गुप्ता यांचा सत्कार स्वाती साठे यांनी केला. कार्यक्रमादरम्यान डॉ. जालिंदर सुपेकर यांनी अमिताभ गुप्ता यांचा महाराष्ट्र कारागृह विभागातील कार्यकालादरम्यान केलेले अप्रतिम बदल याची माहिती कॉफी टेबल बुक द्वारे सर्व उपस्थितांना दिली.

तसेच कॉफी टेबल बुकचे वाटप उपस्थित मान्यवरांना करण्यात आले. यावेळी विविध अधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. अमिताभ गुप्ता यांनी मोलाचे मार्गदर्शन करत त्यांचे विविध विभागामधील अनुभव सांगितले. आभार प्रदर्शन सुनिल ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह यांनी केले.