महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : काळेपडळ परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन शहाजी शेलार यांच्या खून प्रकरणी१२ आरोपींना जन्मठेप व ५ लाख रूपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.
काळेपडळ परिसरात सामाजीक कार्य करीत असताना शेलार यांची लोकप्रियता वाढत असल्याने आरोपीनी संगनमत करून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने दि. २७ सप्टेंबर २०१४ रोजी त्यांचा काळेबोराटेनगर सुपर मार्केटजवळ खुन केल्याने हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता.
विशेष जिल्हा व सत्र न्यायाधिश, शिवाजीनगर पी.पी. जाधव यांच्या न्यायालयात दाखल गुन्ह्याची नियमीत सुनावणी चालु होती. न्यायालयाने १) अमित अर्जुन फल्ले (रा. ओमकार कॉलनी काळेपडळ हडपसर पुणे,) २) अनिल तुकाराम सोमवंशी, ३) अनिल सुभाष राख (रा. काळेबोराटे नगर हडपसर), ४) धनाजी आनंदा वनांगडे (रा. सातवनगर हांडेवाडी रोड, हडपसर), ५) आशुतोष ऊर्फ पिंक्या अशोक बुट्टे पाटील (रा. ऊरूळी कांचन पुणे), ६) गणेश रामान्नु चव्हाण (रा. काळेपडळ हडपसर पुणे), ७) धिरज अनिल ढगरे (रा. ससाणेनगर हडपसर पुणे), ८) अनिल बापु माने (रा. काळेपडळ हडपसर पुणे), ९) राजेंद्र रावसाहेब कांबळे (रा. वैदुवाडी, हडपसर पुणे), १०) अमित चंद्रकांत घाडगे (रा. शेवाळवाडी फाटा मांजरी पुणे), ११) जग्गनाथ ऊर्फ जग्गु केरबा चौगुले (रा. सातवनगर हांडेवाडी रोड, हडपसर पुणे), १२) बाबासाहेब भगवान हरणे (रा. कामठे वस्ती माळवाडी हडपसर पुणे) यांना दोषी ठरवून जन्पठेपेची शिक्षा तसेच प्रत्येकी ५ लाख रूपये दंड व दंड न भरल्यास १ वर्ष साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
दाखल गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहा. पोलीस आयुक्त राजन भोगले यांनी केला होता. यामध्ये विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वला पवार यांनी कामकाज पाहीले होते. केसचे कामकाज पोलीस उप आयुक्त परि- ५. आर राजा, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगल मोढवे, उमेश गित्ते, यांच्या सुचना प्रमाणे पोलीस अंमलदार, अविनाश गोसावी, राजु कांबळे, संभाजी म्हांगरे यांनी काम पाहीले आहे.
