टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या स्टुडेंट इंडक्शन कार्यक्रम उत्साहात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शिक्षणक्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. पारंपारिक शिक्षणाबरोबरच नवे-नवे अभ्यासक्रमासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अमलात येऊन कार्यवाही सुरू झाली आहे. कौशल्यधिष्ठित नवे अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. एकाचवेळी विद्यार्थ्यांना दोन पदव्या घेता येणार आहेत.
याचबरोबरच परिपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासासाठी खेळ, क्रीडा, विविध सांस्कृतिक उपक्रमात ही सहभागी व्हा.जीवनात सर्वोत्तम व्यक्ती म्हणून यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी आगामी काळात चाकोरी बाहेरच्या शिक्षणाला अधिक महत्त्व द्यायला हवे.” असे प्रतिपादन खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी केले.
टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या स्टुडेंट इंडक्शन कार्यक्रमामध्ये अध्यक्षीय समारोपमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कृष्णकुमार गोयल बोलत होते. याप्रसंगी चिटणीस आनंद छाजेड, संस्था पदाधिकारी रमेश अवस्थे, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, सर्व शाखांचे उपप्राचार्य, सर्व अभ्यासेतर उपक्रमांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. संस्था आणि महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख आपल्या मनोगतातून त्यांनी सांगितला. या शैक्षणिक वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी ‘दिक्षारंभ’ या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.सुचेता दळवी आणि प्रा. नमिता कुलकर्णी यांनी केले होते.
यावेळी आय क्यू ए सी, एन एस एस, विद्यार्थी विकास, सांस्कृतिक, परीक्षा, क्रीडा विभाग, ग्रंथालय, कार्यालयीन कामकाज प्रमुख उपप्राचार्य राजेंद्र लेले, प्रा. महादेव रोकडे, उपप्राचार्य डॉ. सुचेता दळवी, डॉ. अर्जुन मुसमाडे, प्रा. अरुण शेलार, डॉ. नीलेश काळे, डॉ. महेश बेंडभर, डॉ. नागेंद्र जंगम यांनी विभागातील उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
संस्था सचिव आनंद छाजेड यांनी आभारप्रदर्शन केले. प्रा. नमिता कुलकर्णी यांनी सूत्र संचालन केले. या कार्यक्रमासाठी सर्व शाखांच्या प्रथम वर्षाचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
