गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने खासगी बँकेच्या वाहन लोन रिकव्हरी एंजटवर कारवाई करून त्याच्याकडून बळजबरीने ताब्यात घेतलेली दुचाकी जप्त केली आहे. त्याच्यावर खंडणी वसूल केल्यामुळे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
लोन वर घेतलेल्या गाड्यांच्या संदर्भात सर्व सामान्य नागरिकांना रिकव्हरी एंजट कडून होत असलेल्या त्रासाच्या अनुषंगाने गोपनीय माहिती काढून कारवाई करण्याच्या सुचना अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे यांनी विरोधी पथक-२ गुन्हे शाखा पुणे शहर यांना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने मार्केटयार्ड परिसरामध्ये माहिती घेत असताना एका सर्व सामान्य नागरिकांची अडवणूक करुन आय. सी. आय. सी. आय बँकेचे रिकव्हरी एंजट असल्याचे सांगुन त्यांची बर्गमन टू-व्हिलर कर्जाचे हप्ते थकले आहेत.
या कारणास्तव स्वतःची कोणतीही ओळख न देता जबरदस्तीने काढून निघुन जावुन सदरची दुचाकी गाडी परत करण्यासाठी ३७,५००/-रुपये स्वतःचे अॅकाऊंट वर खंडणी स्वरुपात घेतले होते व दुचाकी गाड़ी परत केली नाही अशी तक्रार प्राप्त झाली होती.
नमुद तक्रारीच्या अनुषंगाने विनोद चंदर चव्हाण (वय २३ वर्षे, रा. बिबवेवाडी गंगाधाम चौक, पुणे) येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. अधिक माहिती घेतली असता आरोपीने तक्रारदार यांची गाडी बेकायदेशीररित्या घेवुन पैसे स्वीकारुन त्याच्या गाडीचा परस्पर अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्याच्या विरुध्द मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अटक करण्यात आली आहे. रिकव्हरी एंजट फायनन्स लोनच्या नावाखाली बेकायदेशीररित्या कोणी गाडी घेवुन जात असल्यास सदर व्यक्ती विरुध्द कडक कारवाई करण्यात येत आहे.
अशा घटना होत असल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पुणे पोलिसांमार्फत करण्यात आले आहे. सदरची कामगिरी ही पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, दिलीप गोरे, चेतन आपटे, अमोल घावटे, अनिल कुसाळकर, चेतन चव्हाण, आजिनाथ येडे, प्रशांत शिंदे, पवन भोसले, गणेश खरात, चेतन शिरोळकर महीला पोलीस अंमलदार आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांनी ही कारवाई केलेली आहे.
