तीनशे लोकांची मोफत आरोग्य तपासणी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : जयराज ग्रुपचे संस्थापक कै. हिराभाई शाह (चोखावाला) यांच्या स्मृती दिनानिमित्त मार्केटयार्ड मधील काम करणाऱ्या हमाल व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये डोळे तपासणी, चष्मे वाटप व मोतीबिंदू शास्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आली. तसेच कुटुंबीयांसाठी ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करण्यात आली.
जयराज ग्रुप, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज, एच व्ही देसाई आय हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल यांच्या विद्यमाने या शिबीराचे उदघाटन हमाल पंचायत, कागद, काच, कचरा वेचक संघटनेचे अध्यक्ष बाबा आढाव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना कै. हिराभाईंनी समाजाचे विश्वस्त म्हणून काम केले असल्याने त्यांना समाजातील घटकांची काळजी होती. म्हणून त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जयराज ग्रुप खूप चांगले, स्तुत्य उपक्रम अनेक वर्षांपासून राबवत असल्याने मी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थीत रहातो असे बाबा आढाव म्हणाले.
याप्रसंगी जयराज ग्रुपचे प्रमुख राजेश शहा, रोटरीचे अध्यक्ष समीर प्रभुणे, डॉ. विनोद शहा, पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार, माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया, डॉ. प्रभाकर महाजन, पूना गुजराती बंधू समाजचे जॉईंट मॅनेजिंग ट्रस्टी नैनेश नंदू, विनोद डेडिया, विवेक कुलकर्णी, सचिन नहार, नितीन नहार, दिलीप रुणवाल इत्यादी उपस्थीत होते.
या शिबीरामध्ये एकूण 300 लोकांची मोफत तपासणी करून 200 लोकांना चष्मे वाटप व मोतीबिंदू शास्त्रक्रीयेसाठी 25 लोकांची नावे नोंदणी करण्यात आली, ही मोतीबिंदू शस्त्रक्रिया एच व्ही देसाई आय हॉस्पिटल येथे मोफत करण्यात येणार आहेत. तर या शिबीरात एकूण 50 महिलांची ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी केली.
