हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : प्रेमसंबध तुटल्या नंतर प्रेमिकेला त्रास देणाऱ्या एका युवकाने फिर्यादी महिलेच्या मुलावर वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
हडपसर मध्ये बुधवारी भरदिवसा ११:३० वाजता घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने धाव घेत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी ससाणेनगर मधील ३५ वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व यातील आरोपी सागर यांची मागील दोन वर्षापूर्वी या महिलेशी इन्स्ट्राग्रामवर ओळख झाली होती. नंतर ते एकमेकांना भेटू लागले व त्यांचे भेटीचे रुपातंर प्रेमात झाले.
सहा महिन्यापूर्वी ही गोष्ट फिर्यादी यांचा भाचा याला कळाली. त्यावेळी त्याने दोघांना समज दिली होती त्यानंतर देखील आरोपी सागर हा फिर्यादीला वेळोवेळी फोन करायचा व तिला भेटायला तिच्या घरी हडपसर या ठिकाणी यायचा.
त्यावेळी फिर्यादीने त्याला यापुढे आपल्यामध्ये कोणते संबंध ठेवू नको असे बोलून घरातून हाकलून दिले व आरोपीचा फोन ब्लॉक केला. त्यानंतरही सागर फिर्यादी यांचे घरी आला. त्यावेळी फिर्यादी हिने त्याला घरातून जाण्यास सांगितले. असता त्याने फिर्यादीच्या गळयाला चाकू लावून माझ्यासोबत चल, नाहीतर तुझा जीव घेईल असे बोलुन धमकी दिली.
त्यांच्यामध्ये झटापट झाली व चाकू फिर्यादीच्या हनुवटीस लागला तसेच फिर्यादीच्या मुलाजवळ जावुन तुझ्यामुळे आपल्या प्रेमात आढथळा येत आहे. आता तुझ्या मुलाचा जीव घेतो असे बोलून चाकुने फिर्यादीचे मुलाचे गळयावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सागर सुर्वे, (वय ३० वर्षे, रा. साखरगाव, ता. फलटण, जि. सातारा) यास अटक केली आहे. हा तपास सहायक पोलीस निरीक्षक. प्रविण अब्दागिरे करीत आहेत.
