वरुण राजाची यंदा चांगलीच कृपा दृष्टी : प्रत्यक्षात बरसला ६१६ मिमी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील अनेक भागात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. ताम्हिणी, लोणावळा, पुणे शहर, लवासा या भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. धरणे देखील भरली आहेत. जुलै महिन्यात शिवाजीनगरला झालेला पाऊस हा २०१२ नंतरचा सर्वाधिक आहे. यंदा जुलैमध्ये ३९४ मिमी पाऊस पडला. पुण्याची चार महिन्यांची पावसाची सरासरी ६३८ मिमी आहे. जून-जुलै महिन्यात सरासरी ३४६ मिमी असते, प्रत्यक्षात ६१६ मिमी पाऊस झाला आहे.
वरुणराजाने यंदा पुण्यावर चांगलीच बरसात केली. वातावरणातील अनुकूलतेमुळे जुलैमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात पुण्यात सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद झाली. जून, जुलैमध्ये शहरात ६१६ मिलीमीटर पाऊस पडला, जुलैमध्ये जिल्ह्यातील घाट माथ्यावर ताम्हिणी घाटात सर्वाधिक पाच हजार मिलीमीटर पाऊस नोंदवला.
पुण्यात जूनमध्ये महिनाभर पावसाने ओढ दिली. पण जूनअखेरीस जोरदार बरसला, शिवाजीनगरला जून अखेरपर्यंत २५१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शेवटच्या आठवड्यात भरपूर पाऊस झाला. जुलै महिन्यात शिवाजीनगरला ३९४ मिमी पावसाची नोंद झाली.
ही आकडेवारी २०१२ नंतरची सर्वाधिक आहे. जुलै मधील सरासरी पावसापेक्षा ही नोंददुप्पट आहे. ताम्हिणीत धो धो! घाटमाथ्यावर यंदा सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला. त्यातही ताम्हिणीमध्ये गेल्या २४ तासांत ३४० मिमी पाऊस झाला.
पुण्यात झालेला पाऊस (मिमी)
२ जुलै २४ ३.७ ३ जुलै १२.६ ९ जुलै १५.७ १३ जुलै १०.५ १४ जुलै ३७ १५ जुलै २६.६ १८ जुलै ५.६ २० जुलै २.६७ २१ जुलै ३ २२ जुलै ४.६ २३ जुलै ११.१ २४ जुलै ३९.९ २५ जुलै ११४.१ २६ जुलै ५६.२ २८ जुलै ३.२ २९ जुलै ८.६ ३० जुलै ७
