आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

डिजिटल मीडियाचा वापर करताना काळजी घेणे महत्त्वाचे : तुकाराम गोडसे

Spread the love

पुणे : सध्याचा काळ हा डिजिटल मिडीयाचा काळ आहे.दहा वर्षापूर्वी डिजिटल मीडियाची एवढी क्रेझ नव्हती पण जसा काळ बदलत गेला तसा डिजिटल मीडियामध्ये नवीन प्रणाली उदयास आली. युट्युब हे जगातील सर्वात मोठे डिजिटल माध्यम आहे. त्या माध्यमातून करोडो लोक पैसा कमवत आहेत. डिजिटल मीडियाचा वापर करताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे मत प्रिंट व डिजिटल मिडिया संघटनेचे जिल्हा समन्वयक तुकाराम गोडसे यांनी व्यक्त केले.

प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य संघटनेची हवेली व दौंड तालुक्याची सुसंवाद बैठक लोणी काळभोर रामदरा येथील रिसॉर्ट येथे पार पडली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनेची आगामी काळातील ध्येयधोरणे, संघटनेच्या सभासदांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविणे, सभासदांकडून आलेल्या विविध सुचनांची चर्चा करुन सर्व संमतीने नवीन कार्यक्रम आयोजित करणे, सभासद व पदाधिकारी यांच्या संमतीने उपस्थित प्रश्नांवर सखोल चर्चा झाली.

यावेळी संघटनेचे जिल्हा समन्वयक तुकाराम गोडसे यांच्या महाराष्ट्र खबर न्यूजला यूट्यूबचे सिल्वर बटन मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तुकाराम गोडसे यांनी यूट्यूब चॅनल सुरू करून तो चांगल्या पद्धतीने कसे चालवावे या बाबत मार्गदर्शन केले.

यावेळी अध्यक्ष सुनील जगताप, जिल्हाध्यक्ष बाप्पू काळभोर, सचिव संदीप बोडके, खजिनदार विजय काळभोर, सल्लागार तुळशीराम घुसाळकर, जिल्हा समन्वयक तुकाराम गोडसे, चंद्रकांत दुंडे, जितेंद्र आव्हाळे, अमोल भोसले, रियाज शेख, अमोल अडागळे, गौरव कवडे तर दौंड तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी सचिव राहुलकुमार अवचट, कार्याध्यक्ष मनोजकुमार कांबळे, उपाध्यक्ष संदीप भालेराव, विलास कांबळे, मुख्य प्रतोद संतोष जगताप, संघटक मिलिंद शेंडगे, सदस्य सोनबा ढमे, नेताजी खराडे, सतीश गायकवाड आदि उपस्थित होते.