आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना केले जेरबंद

Spread the love

पुणे : बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास येरवडा पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्या साथीदारासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकाचे पोलीस अंमलदार तुषार खराडे, सुशांत भोसले, सुरज ओंबासे हे २६ जुलै रोजी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त खबर मिळाली की, संगमवाडी येथील दत्त मंदिराच्या मागे दोन संशयीत इसम थांबलेले असून त्यांचेकडे देशी बनावटीचे पिस्टल आहे.

तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक स्वप्नील पाटील, व स्टाफ यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे अग्नीशस्त्र बाळगणाऱ्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे १ पिस्टल व १ राऊंड मिळून आले.

रोहन रमेश पवार (वय १८ रा. पगडे वस्ती चऱ्होली) व एक विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून एकूण ३०,०००/- रु किंमतीचे १ पिस्टल व १ राऊंड हस्तगत करण्यात आले आहेत.

या गुण्यामध्ये अभिजीत उमेश अवचरे (वय १८ वर्षे रा पिसोळी पुणे) व शाम संतोष गायकवाड (वय १९ वर्षे रा झेंडेवाडी ता. पुरंधर पुणे)असे एकूण ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील करीत आहेत.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) छगन कापसे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहेर, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस अंमलदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले यांनी केलेली आहे.