आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

चाकणमध्ये टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

Spread the love

पुणे : भरधाव जाणाऱ्या टेम्पोने दिलेल्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (९ ऑगस्ट) सकाळी ७:४५ सुमारास चाकणमधील माणिक चौकात घडली.

या प्रकरणी अक्षय रोहिदास केदारी (वय ५९, रा. वाकी, ता. खेड) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाळासाहेब बाजीराव लामखेडे (वय ३९, रा. केळवाडी, ता. संगमनेर, नगर) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील रोहिदास केदारी हे चाकणमधील माणिक चौक येथे पायी रस्ता ओलांडत होते. त्यावेळी शिक्रापूर कडून चाकणच्या दिशेने येणाऱ्या आयशर टेम्पोने त्यांना धडक दिली. यामध्ये रोहिदास केदारी यांच्या छातीला, पायाला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हा तपास चाकण पोलिस करीत आहेत.