आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गॅस कंपनीमधून बोलत असल्याचे भासवून फसवणूक

Spread the love

पुणे : गॅस कंपनीमधून बोलत असल्याचे भासवून फिर्यादी यांचा मोबाईलचा अॅक्सेस घेवून १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना हडपसर परिसरात घडली आहे.

याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अनोळखी युवकाने फिर्यादिशी संपर्क साधला. गॅस कंपनीमधून बोलत असल्याचे भासवून फिर्यादी यांचा मोबाईलचा अॅक्सेस मागितला.

गॅस कंपनी कडून फोन असल्याने फिर्यादी यांनी मोबाइलचा अॅक्सेस त्याला दिला. त्यानंतर त्या तरुणाने फिर्यादींच्या बँक खात्यातून १३,८२,५३७/- रु. काढून घेतले. हा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे करीत आहेत.