महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी येथे “स्वातंत्र्य दिन” व मोफत पेपर वाचन विभागतील ३१ वाचकांना एक लाख रुपयांचा इन्शुरन्स पॉलीसिंचे वाटप करून साजरा करण्यात आला.
बार्शी येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी येथे “स्वातंत्र्य दिन” श्री जैनाश्रमचे जेष्ठ श्रावक प्रमुख पाहुणे शांतीलाल सरदारमल पुनमिया व सौ.ताराबाई शांतीलाल पुनमिया यांच्या हस्ते ध्वजरोहनाचा कार्यक्रम झाला.
प्रमुख पाहुणे शांतीलाल पुनमिया यांचा सत्कार वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते करण्यात आला व सौ.ताराबाई पुनमिया यांचा सत्कार जयश्री सुराणा यांच्या हस्ते करण्यात आला.
या नंतर मोफत पेपर वाचन विभागतील ३१ वाचकांना एक लाख रूपयेचा इन्शुरन्स पाॅलिशीचे वाटप श्री जैनाश्रमचे अध्यक्ष जयचंद सुराणा, व जैन मंदिरचे प्रदिपभाई बागमार, वाचनालयाचे पदाधिकारी व संचालक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या वेळी वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ, ऑनर्री सेक्रेटरी आनंद पुनमिया , संचालक धिरज कुंकूलोळ,आनंद सुराणा, प्रमोद भंडारी, रूपेश कांकरिया,अशोक कांकरिया, हे उपस्थित होते.
श्री जैनाश्रमचे ट्रस्टी भारतभाऊ कोटेचा,अध्यक्ष जयचंद सुराणा,उपाध्यक्ष चंद्रकांत कोठारी, ऑ.सेक्रेटरी अॅड.दिनेश श्रीश्रीमाळ,तसेच सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ,सभासद, महिला वर्ग ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन वाचनालयाचे संचालक धिरज कुंकूलोळ यांनी केले व प्रास्ताविक वाचनालयाचे संचालक आनंद सुराणा यांनी केले.
आभार प्रदर्शन वाचनालयाचे संचालक धिरज कुंकूलोळ यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव,सहायक.ग्रंथपाल पल्लवी तौर , विराज पतंगे रेखा यादव यांनी परिश्रम घेतले.