आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दुभाजकाला धडकून दुचाकीस्वार ठार

Spread the love

पुणे : बाणेर येथील कळमकर ऑफीस समोर गणपती मंदिरजवळ रस्त्यावरील दुभाजकाला धडकून एक तरुण दुचाकीस्वार ठार झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री ११:३० च्या सुमारास हा अपघात झाला. मध्यरात्रीच्या सुमारास हा तरुण दुचाकीवरून भरधाव जात होता. स्पीड ब्रेकर वरून स्लीप होऊन रोडच्या दुभाजकाला धडकून गंभीर जखमी झाला होता.

अभिजीत पोपट सहाणे, (वय २२ वर्षे रा. मु.पो.नांदगाव, ता. मुळशी जि. पुणे) असे या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार शिवाजी आदिनाथ राहिगुडे, यांनी फिर्याद दिली आहे. हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर करीत आहेत.