तक्रार मागे न घेतल्याने लाथा बुक्यांनी मारहाण
डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
पुणे : पोलिसात दिलेली तक्रार मागे न घेतल्याने भालेकर वस्ती गणेश मंदिरजवळ एका तरुणास बेदम मारहाण केल्याची घटना डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
या प्रकरणी डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना १५ ऑगस्ट सायंकाळी ०७ च्या सुमारास घडली. फिर्यादी तरुण फोनवर बोलत असताना त्याच्या ओळखीचा यश कंधारे हा तेथे आला.
तु आमच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घेतो का, नाही मस्ती आली आहे का ? नीट राहायचे आहे की नाही, आमच्या नादी लागतो का असे म्हणून यश कंधारे याने लोखंडी हत्यार काडुन फिर्यादी यांच्या डाव्या हातावर मारले. यावेळी गाडीवरुन आलेल्या त्याच्या साथीदारांनी लाथा- बुक्यांनी मारहाण करून फिर्यादीस जखमी करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादी हे तेथुन जात असताना राजेश कंधारे याने पाठीमागुन येवुन पुन्हा फिर्यादीला लाथा बुक्यांनी मारहाण करुन जखमी केले. तसेच पोलीस चौकीत गेलात तर तुझ्या वर चेन साखळी चोरीचा खोटा गुन्हा दाखल करून त्यात अडकवू असे म्हणून धमकी दिली.
पोलिसांनी यश राजेश कंधारे (वय २२ वर्षे) ओम राजेश कंधारे (वय १८ वर्षे) व राजेश विठठल कंधारे (वय ५० वर्षे सर्व रा. रतनदीप सोसा. पटवर्धन बागेजवळ, एरंडवणा) यांना अटक करण्यात आली आहे.हा तपास पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत करीत आहेत.