आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

झाडांना राखी बांधून ‘प्राईड स्कूल’ ने दिला पर्यावरणाचा संदेश

Spread the love

भूम : येथील प्राइड इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्यानी झाडांना राखी बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

राखी पौर्णिमेनिमित्त प्राइड इंग्लिश स्कूलच्या बाल विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन व पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी वृक्षांना राखी बांधली. बेसुमार वृक्षतोड होत असल्याने होणाऱ्या पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी वृक्षांचे महत्त्व पटवून देण्यासाठी या शाळेतील बाल विद्यार्थ्यांनी वृक्षांना राखी बांधून वृक्ष संवर्धन करण्याची शपथ घेतली. रक्षाबंधनाचा हा आगळावेगळा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका मेघा सुपेकर, दीपिका टकले, सेजल सुरवसे, भाग्यश्री डांगे यांच्यासह आशा मेहत्रे व अरुणा बोत्रे यांनी परिश्रम घेतले.