आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पोलीस असल्याचे भासवून २० लाखाची फसवणूक

Spread the love

पुणे : ऑनलाईन माध्यमाव्दारे फिर्यादी यांना मुंबई सायबर क्राईम मधुन पोलीस असल्याची बतावणी करुन २० लाख रुपयास फसवल्याची घटना आंबेगाव परिसरात घडली आहे.

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १६ जुलै रोजी ही घटना घडली आहे.आंबेगाव बुद्रुक येथील एका तरुणाने ही पोलिसात तक्रार दिली आहे.

फिर्यादी यांना एका तरुणाने मोबाईलवर संपर्क साधला.मुंबई सायबर क्राईम मधुन पोलीस असल्याचे बतावणी करुन फिर्यादी यांच्या नावाने मुंबई ते इराण एक पार्सल पाठवविण्यात आलेले आहे. त्यामध्ये एल. एस. डी. हा अमलीपदार्थ , ७ कीलो कपडे सापडले आहेतअसे सांगितले.

फिर्यादी यांचे बँक व्हेरीफाय करायचे आहे असे सांगुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला व फिर्यादी यांना वेगवेगळ्या अकाऊट वर पैसे ट्रान्सफर करण्यास सांगुन फिर्यादी यांची एकुण २०,९०,०४१/-रुपयेची आर्थिक फसवणुक केली आहे.हा तपास पोलीस निरीक्षक शरद झिने करीत आहेत.