आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

शेअरमार्केटमध्ये नफ्याच्या आमिषाने फसवणूक

Spread the love

पुणे : शेअर मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवून वडगाव मधील एका इसमाची १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी वडगाव बुद्रुक मधील एका ५६ वर्षाच्या नागरिकाने पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे फेसबुक सरफिंग करत होते. तेव्हा एका तरुणाने त्यांना शेअर मार्केट ची जाहिरात पाठवुन त्याद्वारे व्हॉटसँप ग्रुपला अँड करुन शेअर मार्केटचा व्हिडीओ व मेसेज ग्रुपला अँड करुन घेतले.

शेअर्स खरेदी विक्री करुन त्यातुन १०% या प्रमाणात मोबदला मिळत असल्याचे स्क्रिन शॉट ग्रुपवर शेअर करुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. खोटे आमिष व प्रलोभन दाखवून विविध बँक खात्यावर पैसे पाठविण्यास भरीस पाडले. फिर्यादी यांची एकुण १८,४०,०००/-रुपयाची आर्थिक फसवणुक केली आहे. हा तपास पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर करीत आहेत.