आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

नोकरीच्या आमिषाने महिलेची फसवणूक

Spread the love

पुणे : ऑनलाईन माध्यमाव्दारे टेलीग्राम अॅपच्या माध्यमातुन संपर्क करुन महिलेस पार्ट टाईम नोकरीचे अमिष दाखवुन फसवणूक केल्याचा प्रकार मुंढवा परिसरात घडला आहे.

या प्रकरणी मुंढवा पोलीस स्टेशनंमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २०२३ साली सप्टेंबर महिन्यात घडली आसून . मोबाईल धारकाने टेलीग्राम अॅपच्या माध्यमातुन संपर्क करुन, फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.

पार्ट टाईम नोकरीचे अमिष दाखवुन ऑनलाईन एल अँड टी कंपनी सब ग्रुप कंपनीना ऑनलाईन रेटींग लाईक करुन चांगली रक्कम कमवता येते असे सांगितले. फिर्यादी यांना एकुण १०,२१,१६८/-रुपये भरण्यास भाग पाडुन आजपरेंत परतावा न मिळाल्याने आर्थिक फसवणुक केली आहे. हा तपास पोलिस निरीक्षक निळकंठ जगताप करीत आहेत.